Ben Stokes: शुक्रवारी कोचीमध्ये पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023 लिलावात अष्टपैलू खेळाडूंच्या बोलीने सर्वांचेच लक्ष वेधले या लिलावात सर्वच फ्रँचायझींकडून अष्टपैलू खेळाडूंना सर्वाधिक पसंती मिळाली. या अष्टपैलू खेळाडूंमध्ये इंग्लंडचा दिग्गज बेन स्टोक्सही होता.
स्टोक्सलाही या लिलावात अनेक संघाकडून मागणी होती, पण चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्यासाठी त्यांनी 16.25 कोटी रुपये मोजले. त्याला चेन्नई सुपर किंग्जने संघात घेतल्यानंतर त्याने लगेचच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर प्रतिक्रिया दिली.
त्याने केवळ पिवळ्या रंगाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या फोटोने सीएसके चाहत्यांचे लक्ष वेधले. अनेक चाहत्यांनी त्याच्या संघातील समावेशाबद्दल आनंदही व्यक्त केला.
स्टोक्स आयपीएल 2022 हंगामात खेळला नव्हता. त्याआधी त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलमध्ये 43 सामने खेळले असून दोन शतकांसह 943 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच स्टोक्स सध्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी देखील गणला जातो. त्याने इंग्लंडला 2019 वनडे आणि 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये विजय मिळवून देण्यात महत्तावाचा वाटा उचलला होता.
दरम्यान, स्टोक्स आयपीएल लिलाव इतिहासातील संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. या यादीत त्याच्यासह ख्रिस मॉरिसही तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 2021 आयपीएल लिलावात 16.25 कोटींची बोली लागलेली.
तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर सॅम करन आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर कॅमेरॉन ग्रीन आहे. सॅम करनला आयपीएल 2023 लिलावातच 18.50 कोटी रुपयांची आणि ग्रीनला 17.50 कोटी रुपयांची बोली लागली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.