Smriti Mandhana  Dainik Gomantak
क्रीडा

Smriti Mandhana Asian Games Record: एशियन गेम्सच्या महामुकाबल्यात स्मृती मानधानाचा विश्वविक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारी ठरली पहिलीच महिला फलंदाज

Smriti Mandhana Record in Asian Games 2026: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व टप्पा गाठला.

Manish Jadhav

Smriti Mandhana 11000 International Runs Record: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व टप्पा गाठला. श्रीलंका संघाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एशियन गेम्सच्या फायनल सामन्यात अर्धशतकी खेळी खेळत स्मृतीने महिला क्रिकेटमध्ये आपल्या 11000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारी ती जगातील पहिलीच महिला फलंदाज ठरली, ज्यामुळे संपूर्ण देशात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मृतीचा फॉर्म अत्यंत सुवर्णकाळातून जात असून ती खेळपट्टीवर उतरली की प्रत्येक सामन्यात नवा विक्रम प्रस्थापित करत आहे.

भारतीय पुरुष क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ज्या प्रकारे प्रत्येक मालिकेत नवनवीन कीर्तिमान रचत होते, अगदी तसाच एक सुवर्णकाळ सध्या स्मृती मानधानाच्या (Smriti Mandhana) कारकिर्दीत सुरु आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला तिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होण्याचा मान मिळवला, तर यापूर्वीच्या एका सामन्यात तिने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू होण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. आता 11,000 धावांचा डोंगर सर करुन तिने महिला क्रिकेट विश्वात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात स्मृतीने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 37 वे अर्धशतक झळकावले. या शानदार खेळीदरम्यान तिने 5 चौकार आणि तब्बल 7 उत्तुंग षटकार ठोकत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ती 79 धावांच्या व्यक्तिगत स्कोअरवर बाद झाली, परंतु यादरम्यान तिने भारतीय संघाला एका भक्कम आणि विशाल धावसंख्येच्या उंबरठ्यावर पोहोचवले. एका टी-20 सामन्यात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता ती तिसऱ्या स्थानी पोहोचली. या विक्रमी यादीत शेफाली वर्मा 9 षटकांसह पहिल्या स्थानावर, तर हरमनप्रीत कौर 8 षटकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने निर्धारित षटकांत केवळ 3 गडी गमावून तब्बल 216 धावांचा डोंगर उभा केला. एशियन गेम्सच्या इतिहासातील महिला क्रिकेटमधील हा आजवरचा सर्वात मोठा स्कोर ठरला. या स्पर्धेत पहिल्यांदाच कोणत्याही महिला संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला. स्मृती मानधानाच्या या अफाट सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आगामी स्पर्धांमध्ये भारतीय संघाची बाजू अधिक मजबूत झाली असून, क्रीडाप्रेमींकडून तिला जोरदार दाद दिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT