Smriti Mandhana Dainik Gomantak
क्रीडा

Women World Cup 2022: स्मृती मंधाना ‘या’ सिंगरला करतेय डेट!

दैनिक गोमन्तक

महिला वर्ल्ड कपच्या (Women World Cup 2022) 10 व्या सामन्यात भारतीय संघाने बलाढ्य अशा वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) 155 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) 123 धावांची तूफानी फलंदाजी करत शतकी खेळी उभारली. स्मृतीने 118 बॉलमध्ये 13 चौकार आणि 2 षटकार मारले, यामध्ये तिचा स्ट्राईक रेट 104.24 चा होता. या शानदार खेळीनंतर स्मृती सोशल मिडियावर (Social Media) तूफान ट्रेण्ड व्हायला लागली आहे. (Smriti Manadhana is dating Palash Muchhhal)

दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, स्मृती लोकप्रिय गायक पलक मुच्छलचा बंधू पलाश मुच्छलला (Palash Muchhhal) डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी पलाशने त्याच्या सोशल मिडियावरील इन्स्टाग्राम आकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्या हातावर SM18 असं गोंदवलेला टॅटू होता. विशेष म्हणजे स्मृती मंधाना 18 नंबरची जर्सी परिधान करते. दुसरीकडे अनेकवेळा स्मृती मंधानाला पलाश मुच्छलसोबत पाहिलं गेलं आहे.

स्मृतीचा हा अभिनेता क्रश

स्मृतीने एका युट्यूब चॅनलशी बोलताना कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आपला क्रश असल्याचं जाहीररित्या सांगितलं होतं. 'सोनू के टीटू की स्वीटी' हा चित्रपट आपल्याला प्रचंड आवडल्याचं मंधाना म्हमाली होती. विशेष म्हणजे स्मृतीने हा चित्रपट दोन वेळा पाहिला होता. यानंतर कार्तिक आपला क्रश असल्याचं सांगितलं होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa Today's News Live: अवजड वाहनांना अनमोड घाट खुला

Sahara Refund Cap: सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा, रिफंडबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

SCROLL FOR NEXT