Nishan Madushka Dainik Gomantak
क्रीडा

SL vs IRE: निशान मदुष्काने केला मोठा धमाका, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू

SL vs IRE: श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात गाले येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या निशान मदुष्काने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

Manish Jadhav

SL vs IRE: श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात गाले येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या निशान मदुष्काने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले आहे.

विशेष म्हणजे, आपल्या पहिल्या कसोटी शतकाचे द्विशतकात रुपांतर करणारा तो श्रीलंकेचा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी, ब्रेंडन कुरुप्पूने 1987 मध्ये पदार्पणाच्या कसोटीत 201* धावांची खेळी केली होती.

कशी होती निशानची खेळी?

वास्तविक, निशान सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. त्याने आपल्या डावात 339 चेंडूंचा सामना करत 205 धावा केल्या.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून 22 चौकार आणि 1 षटकार आला. त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट 60.47 होता. त्याने दिमुथ करुणारत्नेसोबत पहिल्या विकेटसाठी 292 चेंडूत 228 धावांची भागीदारीही केली. निशान बाद झाला तेव्हा श्रीलंकेने 500 धावांचा पल्ला गाठला होता.

कोण आहे निशान मधुष्का

निशान मदुष्का हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 40 सामन्यांमध्ये 59.93 च्या सरासरीने 3,476 धावा केल्या आहेत.

त्याने 11 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. या खेळाडूची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 300 आहे.

खास बाब म्हणजे, निशानने फर्स्ट क्लास करिअरमध्ये 378 चौकार आणि 41 षटकार मारले आहेत. यासोबतच 68 झेल आणि 5 स्टंप आऊटही केले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 62.30 आहे.

श्रीलंका VS आयर्लंड दुसरी कसोटी स्कोअर

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आयर्लंडने पहिल्या डावात 492 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 3 गडी गमावून 686 धावा केल्या आहेत. श्रीलंकेसाठी (Sri Lanka) 2 फलंदाज निशान मदुष्का 205 आणि कुसल मेंडिस 245 यांनी द्विशतके झळकावली.

कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 115 धावांची खेळी केली. सध्या अँजेलो मॅथ्यू 86 धावा करुन खेळत आहे, तर धनंजय डिसिल्वा 10 धावा करुन त्याला साथ देत आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवसाचे तिसरे सत्र सुरु आहे. श्रीलंकेने 195 धावांची आघाडी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT