पणजी : खेलो इंडिया यूथ गेम्सनंतर राष्ट्रीय योगासनात गोमंतकीयांनी पुन्हा एकदा झेंडा फडकवला. नवी दिल्लीत राष्ट्रीय योग ऑलिंपियाडमध्ये गोव्याला सांघिक गटात रौप्यपदक मिळाले. यशिका चेवली, मनस्वी दास, इमा पाटील व शिवौन देसाई यांचा समावेश असलेल्या चमूने मुलींच्या उच्च प्राथमिक गटात शानदार प्रदर्शन केले.
योग ऑलिंपियाड स्पर्धा नवी दिल्लीस्थित एनसीईआरटी यांच्यातर्फे घेण्यात आली. योगासन स्पोर्टस असोसिएशन ऑफ गोवा यांच्यातर्फे दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धेत गोव्याने जिंकलेले हे वर्षभरातील सातवे पदक ठरले.
हरियानातील खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला दोन सुवर्ण व एक रौप्यपदक मिळाले होते. त्या स्पर्धेत गोव्याला फक्त या खेळातच पदके प्राप्त झाली होती. खेलो इंडिया स्पर्धेत यशिका व मनस्वी यांनी तालबद्ध दुहेरी योगासनात रौप्यपदक जिंकले होते. कलात्मक गटात सुवर्णपदक जिंकलेल्या संघातही त्यांचा समावेश होता. आता या दोघींनी इतर योगपटूंसह योग ऑलिंपियाडमध्येही सातत्य राखले.
क्रीडा खात्यातर्फे संघ
योग ऑलिंपियाड स्पर्धेत पदक विजेत्या गोव्याच्या खेळाडूंना विशाल गावस यांचे मार्गदर्शन लाभले. जया पाटील संघाच्या व्यवस्थापक आहेत. या स्पर्धेसाठी क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे संघ पाठविण्यात आला होता. या खात्याचे नवीन आचार्य, दिनेश देसाई, मंथन या अधिकाऱ्यांचेही योगासन संघटनेने आभार मानाले आहेत. स्पर्धेत गोव्याचे एकूण १२ योगपटू सहभागी झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.