Shubman Gill Run - Out X
क्रीडा

IND vs ENG: कुलदीप-गिलचा उडाला गोंधळ अन् सेंच्युरीसाठी 9 धावांची गरज असताना स्टोक्सने केलं रनआऊट

Shubman Gill Run-Out: राजकोट कसोटीत शतकासाठी 9 धावांची गरज असताना शुभमन गिल धावबाद झाला.

Pranali Kodre

Shubman Gill run out on 91 runs:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) राजकोटला सुरू झाला आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी शुभमन गिलकडे शतकाची संधी होती, मात्र कुलदीप यादवबरोबर धाव घेताना झालेल्या गोंधळामुळे त्याची ही संधी थोडक्यात हुकली.

झाले असे की 64 व्या षटकात टॉम हर्टली गोलंदाजी करत होता. त्याने या षटकात कुलदीपला थोडा संघर्ष करायला लावला होता. चौथ्या चेंडूवर त्याने कुलदीपला पायचीत केले असल्याचे रिप्लेमध्ये दिसले होते.

परंतु त्याआधी पंचांनी त्याला नाबाद दिले होते आणि इंग्लंडने रिव्ह्यू देखील घेतला नाही, त्यामुळे त्याला जीवदान मिळाले होते.

त्यानंतर सहाव्या चेंडूवर त्याने शॉट खेळला. परंतु त्यावेळी स्टोक्सने चपळाईने चेंडू पकडला. त्याचवेळी कुलदीपने काही पावले पुढे आल्यानंतर धाव पळण्यासाठी नॉन-स्ट्रायकर असलेल्य गिलला नकार दिला.

मात्र तोपर्यंत गिल जवळपास खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत पळत आला होता. त्यामुळे तो परत जाताना त्याने डाईव्हही मारली, पण तो क्रिजमध्ये पोहचण्यापूर्वीच स्टोक्सने फेकलेला चेंडू पकडून हर्टलीने स्टंपवरील बेल्स उडवले होते. हर्टलीने स्टंपवरील बेल्स उडवण्याआधी त्याची बॅट काही इंचच क्रीजपासून लांब होती.

मात्र यामुळे त्याला बाद व्हावे लागले आणि शतकांची संधीही हुकली. तो 151 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 91 धावा करून बाद झाला.

त्याच्यानंतर काही तिसऱ्या दिवशी पाठीच्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झालेला यशस्वी जयस्वाल पुन्हा फलंदाजीसाठी आला. त्याने 104 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दरम्यान, कुलदीपही 72 व्या षटकात 27 धावांवर बाद झाला.

भारतीय संघाने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत दुसऱ्या डावात 82 षटकात 4 बाद 314 धावा केल्या होत्या. तसेच भारताने 400 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

SCROLL FOR NEXT