Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20I Ranking: शुभमन गिलची तब्बल 168 स्थांनांची गरुडझेप! तर सूर्यकुमार यादव...

आयसीसीने ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली असून शुभमन गिलने मोठी प्रगती केली आहे.

Pranali Kodre

ICC T20I Ranking: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात काही दिवसांपूर्वीच झालेल्या टी20 मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. मात्र, भारताच्या प्रमुख खेळाडूंची घसरण झाली आहे.

आयसीसीच्या टी20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्याच्याव्यतिरिक्त पहिल्या 10 जणांमध्ये कोणताही भारतीय फलंदाज नाही.

पण, न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात शतकी खेळी केलेल्या शुभमन गिलने मोठी झेप घेताना 30 वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे या मालिकेपूर्वी गिल पहिल्या 100 फलंदाजांमध्येही नव्हता. त्याने तब्बल 168 स्थानांची प्रगती केली आहे.

गिलने अहमदाबादला झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यांत 63 चेंडूत 126 धावांची नाबाद खेळी केली होती. यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतके करणारा पाचवा खेळाडू ठरला होता. तो वनडे क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आणि कसोटी क्रमवारीत 62 व्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, शुभमन गिल व्यतिरिक्त भारताचे प्रमुख फलंदाज विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील क्रमवारी घसरली आहे. हे तिघेही न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेचा भाग नव्हते.

विराट 15 व्या, केएल राहुल 27 व्या आणि रोहित शर्मा 29 व्या क्रमांकावर घसरले आहेत. तसेच ईशान किशन न्यूझीलंडविरुद्ध खास कामगिरी करू शकला नव्हता, त्यामुळे त्याची देखील 3 स्थानांनी घसरण झाली असून आता तो 48 व्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजी क्रमवारीबद्दल सांगायचे झाले, तर एकही भारतीय गोलंदाज पहिल्या 10 जणांमध्ये नाही. पण अर्शदीप सिंगने 8 स्थानांची प्रगती करत 13 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पण भुवनेश्वर कुमार 21 व्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच आर अश्विन आणि अक्षर पटेल अनुक्रमे 29 आणि 30 व्या क्रमांकावर कायम आहेत.

अष्टपैलू क्रमवारीत मात्र, हार्दिकला मोठा फायदा झाला आहे. तो आता अष्टपैलू खेळाडूंच्या टी20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीतही प्रगती केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध हार्दिकने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात भरीव योगदान दिले होते. त्यामुळे तो फलंदाजी क्रमवारीत 53 वरून 50 व्या क्रमांकावर आणि गोलंदाजी क्रमवारीत 66 वरून 46 व्या क्रमांकावर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT