Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: जानेवारी महिना गिलसाठी सुपर-डुपर हिट! ICC चा मोठा पुरस्कारही केला नावावर

भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने आयसीसीचा मोठा पुरस्कार नावावर केला आहे.

Pranali Kodre

Shubman Gill: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल गेल्या काही महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याचेच बक्षीस आता त्याला मिळाले असून त्याला आयसीसीचा जानेवारी 2023 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.

जानेवारी 2023 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कारासाठी शुभमनसह न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवे आणि भारताच्याच मोहम्मद सिराज यांनाही नामांकन मिळाले होते. पण शुभमनने कॉनवे आणि सिराज यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे.

शुभमनने जानेवारी महिन्यात भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने या महिन्यात 5 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 6 वनडे सामने खेळले. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. पण त्याने वनडेत तीन सामन्यांत २०७ धावा केल्या. यामध्ये त्याच्या 70 आणि 116 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

तसेच त्याने श्रीलंकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना पहिल्याच सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो वनडेत द्विशतक करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला होता. तसेच तो वनडे द्विशतक करणारा सर्वात युवा क्रिकेटपटूही आहे.

त्याने याच मालिकेतील अखेरच्या सामन्यातही 112 धावांची शतकी खेळी केली होती. तर त्यापूर्वी दुसऱ्या वनडेत नाबाद 40 धावा केल्या होत्या. त्याने या वनडे मालिकेत एकूण 360 धावा केल्या होत्या.

त्यामुळे त्याने तीन सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत बाबर आझमसह संयुक्तरित्य अव्वल क्रमांक पटकावला आहे. आझमनेही 2016 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 360 धावा केल्या होत्या.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर झालेल्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याने 7 आणि 11 धावा केल्या होत्या. हे दोन्ही सामने जानेवारीच्या अखेरीस झाले होते. या मालिकेतील 1 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात शुभमनने 126 धावांची खेळी केली होती.

गिलने केलेल्या या कामगिरीमुळे त्याने भारताच्या वनडे संघातील स्थान जवळपास पक्के केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: शनीचे 'महागोचर'! 5 राशींच्या लोकांना बनवणार करोडपती आणि भाग्यवान; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT