Team India Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 दरम्यान टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर यशस्वी शस्त्रक्रिया, WTC फायनलमधून...

Indian Cricket Team: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) दरम्यान, टीम इंडियाच्या एका खेळाडूशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

Indian Cricket Team: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) दरम्यान, टीम इंडियाच्या एका खेळाडूशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

दुखापतीमुळे या खेळाडूवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. हा खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC फायनल 2023) च्या अंतिम सामन्यातूनही बाहेर गेला आहे. हा खेळाडू टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या मॅचविनरपैकी एक आहे.

टीम इंडियाच्या या खेळाडूवर शस्त्रक्रिया झाली

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पाठीवर ब्रिटनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्रेयस अय्यर बराच काळ पाठीच्या दुखापतीशी झुंजत होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरवर मंगळवारी लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएल 2023 चा भाग होऊ शकला नाही.

तीन महिने क्रिकेटपासून दूर

आयपीएल 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली होती. अहमदाबाद कसोटीत जवळपास पूर्ण दोन दिवस मैदानावर घालवल्यानंतर, अय्यरने पाठीदुखीसंबंधी तक्रार केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत तो फलंदाजीसाठी आला नाही.

टेस्ट संपण्यापूर्वीच अय्यरने अहमदाबाद सोडले. त्याला आता जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर राहावे लागणार आहे. तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर असेल.

टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी

श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 10 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 49 टी-20 सामने खेळले आहेत.

श्रेयस अय्यरने कसोटीत 666 धावा, एकदिवसीय सामन्यात 1631 धावा आणि T20 मध्ये 1043 धावा केल्या आहेत. तो सध्या टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT