Shreyas Iyer X/BCCI
क्रीडा

Shreyas Iyer Catch: भारीच! मागे पळत येत सूर मारून अय्यरने भन्नाट कॅच, इंग्लंडच्या क्रावलीला 76 धावांवर धाडलं माघारी

India vs England, Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत श्रेयस अय्यरने इंग्लंडच्या झॅक क्रावलीचा मागे पळत येत अप्रतिम झेल घेतला.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, Shreyas Iyer Catch:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) खेळवला जात आहे. विशाखापट्टणमला होत असलेल्या या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी चांगले क्षेत्ररक्षण केले आहे. त्यातही श्रेयस अय्यरने घेतलेल्या एका शतकाने सर्वांचेच लक्ष वेधले.

या सामन्यात भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 396 धावांवर संपल्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावातील फलंदाजीसाठी उतरला.

इंग्लंडकडून बेन डकेट आणि झॅक क्वावली यांनी 59 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली होती. पण डकेट 21 धावांवर बाद झाल्यानंतरही क्रावली आक्रमक खेळत होता. त्याने झटपट अर्धशतकही पूर्ण करत इंग्लंडला 20 षटकातच 100 धावांचा टप्पा पार करून दिला होता.

तसेच क्रावली भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व ठेवत शतकाकडे वाटचाल करत होता. पण याचवेळी 23 व्या षटकात अक्षर पटेलने टाकलेल्या फुल लेंथच्या चेंडूवर क्रावलीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे नियंत्रण नीट बसले नाही.

त्याचवेळी श्रेयस अय्यरने बॅकवर्ड पाँइंटवरून मागे पळत येत सूर मारून अविश्वसनीय झेल घेतला.

त्याच्या या अप्रतिम झेलामुळे क्रावलीला 78 चेंडूत 76 धावा करून माघारी परतावे लागले. त्याने या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. दरम्यान, त्याचा झेल ज्याप्रकारे श्रेयस अय्यरने घेतला, त्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

दरम्यान, क्रावली बाद झाल्यानंतर मात्र इंग्लंडने नियमीत अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे इंग्लंड संघ संकटात सापडला होता. त्यातच जसप्रीत बुमराहच्या तिखट माऱ्याने इंग्लंडचा डाव कोलमडला. इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून क्रावलीनेच सर्वाधिक धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 3 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने शानदार द्विशतकी खेळी केली. त्याने 290 चेंडूत 209 धावा केल्या. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 7 षटकार मारले.

तसेच त्याच्यानंतर भारताकडून शुभमन गिल आणि रजत पाटीदार यांनाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. गिलने 34 आणि रजतने 32 धावा केल्या.

इंग्लंडकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच टॉम हर्टलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT