Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के! दुखापत सोडेना श्रेयसची 'पाठ', तर 'हा' खेळाडूही Asia Cup 2023 मधून बाहेर?

आगामी आशिया चषकातून श्रेयस अय्यरशिवाय टीम इंडियाचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू बाहेर होऊ शकतो.

Pranali Kodre

Shreyas Iyer and KL Rahul out of Asia Cup 2023 ? : आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप अशा महत्त्वाच्या स्पर्धा यावर्षी खेळवल्या जाणार आहेत. पण याचदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) सध्याच काही अनुभवी खेळाडूंच्या दुखापतींची चिंता सतावत आहे.

त्यातच आता असेही समोर येत आहे की श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोन महत्त्वाचे खेळाडू 31 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही शस्त्रक्रियातून सध्या सावरत आहेत.

श्रेयस अय्यरवर पाठीची शस्त्रक्रिया

मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यापासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. त्याला गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याच्या पाठीवर मार्चमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली.

त्यामुळे त्याला आयपीएल 2023 स्पर्धेला आणि कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकावे लागले. सध्या तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असून त्याच्या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण अजूनही तो पूर्ण बरा झाला नसून त्याला पाठीचा त्रास जाणवत आहे.

याबद्दल एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की 'अय्यरने नुकतेच त्याच्या पाठीच्या वेदनेवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये इंजेक्शन घेतले आहे. कारण अजूनही त्याची पाठ त्याला त्रास देत आहे.' त्यामुळे आता श्रेयस कधीपर्यंत क्रिकेटपासून दूर राहाणार आणि कधी तंदुरुस्त होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याचमुळे तो आशिया चषकाला मुकण्याची शक्यता आहे.

केएल राहुलवरही शस्त्रक्रिया

आयपीएल 2023 स्पर्धा खेळत असताना 1 मे रोजी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या उजव्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यामुळे तोही सध्या या शस्त्रक्रियेनंतरच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. त्यामुळे त्यालाही पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही महिने लागणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोही आगामी आशिया चषकात खेळण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल व्यतिरिक्त ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या दुखापतीची चिंताही भारतीय संघ व्यवस्थापनाला आहे. पण गेल्या 9 महिन्यापासून भारतीय संघातून बाहेर असणारा बुमराह आशिया चषकात खेळू शकतो असे म्हटले जात आहे. त्याच्यापाठीवरही काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

तसेच 2022 च्या अखेरीस झालेल्या कार अपघातामुळे झालेल्या दुखापतींमधून पंत सावरत आहे. त्यामुळे तोही आशिया चषकात खेळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT