Shoaib Malik - Sania Mirza Dainik Gomantak
क्रीडा

Shoaib Malik - Sania Mirza: सानिया-शोएब होणार वेगळे? 'या' गोष्टीमुळे पुन्हा चर्चांना उधाण

Shoaib Malik - Sania Mirza: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यात कटूता आल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत असून आता एका गोष्टीमुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

Pranali Kodre

Shoaib Malik - Sania Mirza divorce rumours: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक हे सेलिब्रेटी जोडपं अनेकदा चर्चेत येत असते. गेल्या काही काळात त्यांच्या नात्याबद्दलच चर्चा अधिक झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते वेगळे होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता एका गोष्टीमुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

शोएब मलिकने त्याच्या बदललेल्या इंस्टाग्राम बायोमुळे त्याच्या सानिया मिर्झाबरोबरच्या घटस्पोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. सध्या सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांनुसार त्याने त्याच्या इंस्टाग्राम बायोमधील सानिया मिर्झाचा पत्नी म्हणून उल्लेख असलेले वाक्य काढून टाकले आहे.

Shoaib Malik Viral Instagram Bio

शोएबच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील जुन्या आणि अपडेट केलेल्या बायोचे स्क्रिनशॉटही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्याच्या जुन्या बायोमध्ये लिहिले होते की 'सुपरवूमन सानिया मिर्झाचा पती.'

पण आता त्याच्या नवीन बायोमध्ये हे वाक्य दिसत नाहीये. त्याचमुळे आता अनेक युजर्सने शोएब आणि सानिया यांच्यात घटस्पोट होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. तसेच गेल्या काही काळात ते एकत्रही दिसले नसल्याने युजर्सने त्यांच्या नात्यात कटूता आल्याचेही कयास बांधले आहेत.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अद्याप शोएब किंवा सानिया यांनी या चर्चांबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. शोएब आणि सानिया यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. त्यांना ऑक्टोबर 2018 मध्ये मुलगाही झाला, ज्याचे नाव इझहान मिर्झा मलिक असे असून अनेकदा त्याच्याबरोबरचे फोटो सानिया आणि शोएब शेअर करत असतात.

तथापि, सानियाने याचवर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीत उपविजेतेपद मिळवल्यानंतर टेनिसमधून निवृत्ती घोषित केली होती. त्यावेळी तिला शोएबने सोशल मीडियातून शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT