Babar Azam
Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: बाबर आझम आयपीएलमध्ये असता तर...,शोएब अख्तरला ऐकून थक्क व्हाल!

दैनिक गोमन्तक

जगभरातील प्रतिभावान आणि दिग्गज क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतात आणि चमकदार कामगिरी करुन चाहत्यांची मने जिंकतात. परंतु पाकिस्तानचे खेळाडू जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. मात्र, असे असूनही पाकिस्तानचे (Pakistan) अनेक माजी क्रिकेटपटू सध्याच्या काळात आयपीएलमध्ये (IPL 2022) पाकिस्तानी खेळाडू असते तर कदाचित त्यांना सर्वाधिक पैसे मिळालेअसते, असे सांगत सुटले आहेत. (Shoaib Akhtar says Rs 15-20 crore would have been spent on Babar Azam in IPL auction)

दरम्यान, असचे काहीसे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सांगितले आहे. शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''बाबर आझम (Babar Azam) जर आयपीएल लिलावात असता तर संघांनी त्याच्यावर 15 ते 20 कोटी रुपये खर्च केले असते.''

तसेच, बाबर आझम जर आयपीएल लिलावात उतरला असता तर त्याला मोठी रक्कम मिळाली असती यात शंका नाही. परंतु शोएब अख्तरचे 20 कोटी रुपयांपर्यंतचे म्हणणे जरा जास्तच आहे. तसे, शोएब अख्तरने आणखी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.

शोएब अख्तर म्हणाला की, 'विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम यांना एक दिवस आयपीएलमध्ये एकत्र ओपनिंग करताना बघायचे आहे.' शोएबची इच्छा कधी पूर्ण होणार नाही, परंतु बाबर आणि विराट कोहली हे दोघेही खरोखरच अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत.

शिवाय, आयपीएलच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. त्यात शाहिद आफ्रिदी, सोहेल तन्वीर, मिसबाह-उल-हक, शोएब अख्तर, सलमान बट, उमर गुल, अझहर महमूद, शोएब मलिक, मोहम्मद हाफीज, मोहम्मद आसिफ, कामरान अकमल आणि युनूस खान यांच्यासह एकूण 11 पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT