IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्स मध्ये 'काटे की टक्कर'

या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे.
IPL 2022
IPL 2022Dainik Gomantak

IPL 2022: IPL 2022 मध्ये, मंगळवारी संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. आयपीएलच्या या मोसमात, हे दोन्ही संघ आपला पहिला सामना खेळणार आहेत आणि त्यांना स्पर्धेत विजयाने सुरुवात करायची आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन आहे, तर राजस्थानची कमान संजू सॅमसनकडे आहे. गेल्या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक होती आणि यावेळी त्यांना नव्याने सुरुवात करायची आहे. (The match between Sunrisers Hyderabad and Rajasthan Royals will be played today)

IPL 2022
माजी कबड्डीपटूची चाकूने भोसकून हत्या; पाटील यांनी राज सिंगला दिली होती धमकी

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावामध्ये हैदराबाद (Sunrise Hyderabad) आणि राजस्थानच्या संघांनी अनेक युवा खेळाडूंवर मोठा सट्टा लावला. याशिवाय संघात काही अनुभवी खेळाडूही आहेत, जे संघाला मजबूत करतात. दोन्ही संघांच्या मागील रेकॉर्डबद्दल सांगत आहे.

आतापर्यंत हैदराबाद आणि राजस्थानची अशी होती टक्कर

आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 15 सामने खेळले गेले आहेत. यापैकी सनरायझर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात यश मिळवले आहे. गेल्या मोसमात दोघांमध्ये 2 सामने झाले, ज्यात हैदराबादने एक आणि राजस्थानने (Rajsthan Royals) एक सामना जिंकला. सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर सनरायझर्सची राजस्थानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 201 धावा आहे. तर राजस्थानने सनरायझर्सविरुद्ध सर्वाधिक 220 धावा केल्या होत्या. आतापर्यंतच्या आकडेवारीत आघाडीवर असलेला हैदराबाद यंदाच्या मोसमात राजस्थानविरुद्ध कशी कामगिरी करेल, हे पाहायचे आहे.

टॉसची भूमिका खूप महत्त्वाची असेल

आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत 4 सामने झाले असून चारही सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना यश मिळाले आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवला. यावरून हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात टॉसही मोठी भूमिका बजावू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. असाच ट्रेंड गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड (T20 World Cup) कपमध्ये पाहायला मिळाला होता, ज्याची बरीच चर्चा झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com