Shoaib Akhtar & Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 'भारताला कोणीही रोखू शकत नाही...,' टीम इंडियाच्या विजयानंतर शोएब अख्तरची रिअ‍ॅक्शन

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 33 व्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 33 व्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनेक माजी क्रिकेटपटू कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी महान क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या प्रतिक्रियेने तमाम भारतीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भारताच्या विजयानंतर अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर केला आणि यावेळी भारत विश्वचषक जिंकेल असे भाकित केले. तो म्हणाला की, 'भारताला कोणीही रोखू शकत नाही.'

दरम्यान, या विश्वचषकात भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहून शोएब अख्तरने मेन इन ब्लूचे कौतुक केले. तो म्हणाला की, 'भारतीय संघ सध्या ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहे यावरुन हे स्पष्ट होते की वर्ल्ड कप नक्की जिंकणार. सध्या भारताला कोणीही रोखू शकत नाही.' त्याने भारतीय संघाच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. तो म्हणाला की, 'खासकरुन मी मोहम्मद शमीसाठी खूप आनंदी आहे. भारतीय संघ सध्या उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे.'

विश्वचषकातील सर्वात मोठा विजय

भारतीय संघाने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाचा हा सर्वात मोठा आणि एकूण दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. याच वर्षी ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सविरुद्ध 309 धावांचा सर्वात मोठा विजय नोंदवला होता. भारताच्या 357 धावांना प्रत्युत्तर देताना लंकेचा संघ 55 धावांवर गडगडला. हा भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय आणि एकूण चौथा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह भारतीय संघ 14 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

भारताने सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली

यासह भारतीय संघाने आता उपांत्य फेरी गाठली आहे. मेन इन ब्लूने सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. 2011 मध्ये संघ चॅम्पियन झाला, त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्यानंतर आता भारताने सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाकडे अजून दोन शेवटचे लीग सामने बाकी आहेत, जे जिंकून रोहित ब्रिगेडला अव्वल स्थानावर राहायचे आहे. पुढील सामना 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. त्यानंतर शेवटचा साखळी सामना 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध होईल. उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. भारतीय संघाचा सामना कोणाशी होतो हे पाहणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT