Shoaib Akhtar
Shoaib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: 'भारत पुढच्या आठवड्यात परत येईल...', शोएब अख्तर असं का म्हणाला

दैनिक गोमन्तक

Shoaib Akhtar On Pakistan: झिम्बाब्वेविरुद्धच्या निकराच्या सामन्यात पाकिस्तान संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर पाकिस्तान संघावर सर्वत्र टीका होत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून 4 विकेट्सने पराभव झाला होता. आता पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतासोबतच पाकिस्तानही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडेल, असे भाकित केले आहे.

असे शोएब अख्तर यांनी सांगितले

पाकिस्तानच्या (Pakistan) पराभवावर बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, 'संघाने कोणतेही नियोजन केले नाही. सलामीवीर आणि मिडिल ऑर्डर प्लॉप ठरली आहे. या सुमार संघाने अत्यंत खराब कामगिरी केली.' त्याचबरोबर त्याने पाकिस्तानच्या पराभवात टीम इंडियालाही (Team India) गुंडाळले. तो पुढे म्हणाला की, 'मी यापूर्वीही सांगितले होते की, पाकिस्तान या आठवड्यात परत येईल आणि भारत पुढच्या आठवड्यात परत येईल. तोही तिसमार खान नाही.'

पीसीबीवर आरोप

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) पुढे म्हणाला की, 'पाकिस्तानकडे खूप वाईट कर्णधार आहे. निवड समितीने सुमार संघाची निवड केली. आसिफ अलीला आठव्या क्रमांकावर उतरवले जात आहे. हैदर अलीच्या भूमिकेबाबत कोणतीही योजना नाही. यंदाच्या टी-20 विश्वषचकात (T-20 World Cup) पाकिस्तानची कामगिरी सुमारच राहीली.'

उपांत्य फेरी गाठणे कठीण

2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान सलग दोन सामने हरला आहे. संघाने पहिला सामना भारताकडून 4 विकेटने तर झिम्बाब्वेकडून 1 धावाने गमावला. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत. भारतालाही हे तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पाकिस्तानने 2009 मध्ये एकमेव टी-20 विश्वचषक जिंकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT