T20 World Cup: पाकिस्तानच्या आशा जिवंत, बाबर सेना अजूनही गाठू शकते उपांत्य फेरी

Pakistan Team: T20 विश्वचषक 2022 पाकिस्तान संघासाठी आतापर्यंत दुःस्वप्नापेक्षा कमी नाही.
Pakistan cricket team
Pakistan cricket team Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan ICC T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 पाकिस्तान संघासाठी आतापर्यंत दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानला पराभूत केले. पण 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सलग दोन पराभव झाल्यानंतरही पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरु शकतो. चला जाणून घेऊया कसे?

ग्रुप-2 ची ही स्थिती आहे

ग्रुप-2 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध धमाकेदार शैलीत विजय मिळवला. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा एक सामना रद्द झाला आणि एका सामन्यात त्याने विजय मिळवला. त्यामुळे आफ्रिकन संघाचे तीन गुण आहेत. तर झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाचेही तीन गुण आहेत. सध्या या समीकरणानुसार भारतीय संघ उपांत्य फेरीत जाणार आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकाही (South Africa) उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.

Pakistan cricket team
T20 World Cup: किंग कोहलीच्या नावावर 'विराट विक्रम'

पाकिस्तानला नशिबाची गरज आहे

टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने (Pakistan) सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानने अद्याप दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळलेले नाहीत. मात्र पाकिस्तानने हे तीन सामने मोठ्या फरकाने जिंकले तर त्याचे 6 गुण होतील. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे त्यांच्या उरलेल्या तीन सामन्यांपैकी 2-2 सामने पराभूत व्हावेत, यासाठी त्याला प्रार्थना करावी लागेल. या स्थितीत पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठू शकतो.

Pakistan cricket team
हिट मॅनने रचला इतिहास, T20 World Cup मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

एकदाच T20 विश्वचषक जिंकला

पाकिस्तानने 2009 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून पाकिस्तान या ट्रॉफीपासून दूर आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षी पाकिस्तानी संघाने उपांत्य फेरी गाठली होती. जिथे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आता सध्याच्या टी-20 विश्वचषकातही पाकिस्तान संघाने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार बाबर आझमच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com