Sachin Tendulkar International Record: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॅन आहे. तो नेहमीच विराट कोहलीला त्याच्या खराब कामगिरीच्या वेळी पाठिंबा देताना दिसला आहे.
दरम्यान, शोएब अख्तरने कोहलीबाबत एक भविष्यवाणी केली आहे. सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहली मोडेल, असा विश्वास त्याला वाटतो.
विशेष म्हणजे 11 वर्षांपूर्वी याच दिवशी सचिन तेंडुलकरने बांगलादेशविरुद्ध आपले 100 वे शतक झळकावले होते.
दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 75 वे शतक झळकावले.
अख्तर म्हणाला की, कोहली आता भारतीय संघाचा कर्णधार नाही, तो आता वेगाने धावा करेल.
अख्तरने एएनआयला सांगितले की, “विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतावे लागले, मात्र, माझ्यासाठी हे काही नवीन नाही. त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण होते. आता तो अधिक लक्ष केंद्रित करुन खेळेल. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की, तो 110 शतके ठोकेल आणि सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडेल. आता त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण नाही आणि तो वेगाने धावा करेल.''
तसेच, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या दोहा येथे लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2023 मध्ये आशिया लायन्सकडून खेळत आहे.
अख्तरने 1999 मध्ये भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याची आठवणही सांगितली, ज्यात त्याने सलग चेंडूंवर सचिन आणि द्रविडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
अख्तर पुढे म्हणाला की, “मला आठवतं, मी एकदा माझ्या सहकारी खेळाडूंना सांगितलं होतं की मी सचिनची विकेट घेईन. त्यावेळी आम्ही कोलकात्यात खेळत होतो. मी 100,000 लोकांसमोर पहिल्याच चेंडूवर सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती. सचिन माघारी गेल्यानंतर अर्धे स्टेडियम रिकामे झाल्याचे मला अजूनही आठवते.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.