Shimron Hetmyer vs Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: हेटमायर करणार 'फायर' तर बुमराह ची चालणार जादूगिरी

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सचे पदार्पण राजस्थान रॉयल्ससारखे विजयी सामन्याने झालेले नाही.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे पदार्पण राजस्थान रॉयल्ससारखे विजयी सामन्याने झाले नाही. राजस्थानने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजयी सुरुवात केली. दुसरीकडे मात्र, मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत आता मुंबईला दुसरा सामना जिंकायचा आहे. त्याचबरोबर राजस्थानलाही (Rajasthan Royals) बुलंद विजयाचा मान कायम ठेवायचा आहे. दोन्ही संघांसाठी विजयाचा स्वतःचा एक अर्थ आहे. अशा परिस्थितीत शिमरॉन हेटमायर हा राजस्थानसाठी एक्स फॅक्टर ठरु शकतो. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मुंबई इंडियन्ससाठी मोठी भूमिका बजावू शकतो.(Shimron Hetmyer vs Jasprit Bumrah IPL 2022 match between Rajasthan Royals and Mumbai Indians)

दरम्यान, पॉइंट टॅलीचा सध्याचा ट्रेंड पाहता मुंबईची धार राजस्थानसमोर कमकुवत दिसते. परंतु आयपीएलचे मोठे वास्तव हे आहे की, इथे बेट्स कधीही बदलतात. आणि या प्रकरणात, एक्स फॅक्टर खेळाडू शानदार कामगिरी करु शकतात. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स खरोखरच मजबूत होईल.

हेटमायर विरुद्ध SRH

अर्थात शिमरॉन हेटमायर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. सनरायझर्सविरुद्ध त्याने सुमारे 247 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. सनरायझर्सविरुद्ध त्याने फक्त 13 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 5 चेंडू सीमापार पाठवले होते, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार लगावले होते. त्याने एकूण 32 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

बुमराह विरुद्ध डीसी

दुसरीकडे, बुमराहचा सध्याचा फॉर्म हेटमायरच्या अगदी उलट आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) पहिल्या सामन्यात बुमराहचीच सध्या दिशाभूल झाल्याचे दिसून आले. त्याने 3.2 षटकात 43 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

हेटमायर विरुद्ध बुमराह

दुसरीकडे, जेव्हा हेटमायर विरुद्ध बुमराह यांच्यात टी-20 मध्ये सामना होतो. तेव्हा मुंबई इंडियन्सचे गोलंदाज विजयी होताना दिसतात. हेटमायर आणि बुमराह यांनी टी-20 मध्ये 6 वेळा आमनेसामने आले आहेत. हेटमायर या 6 डावात 3 वेळा बुमराहचा बळी ठरला आहे. त्याने 6 डावात बुमराहचे 13 चेंडू खेळले आणि केवळ 12 धावा केल्या. यादरम्यान हेटमायरच्या बॅटमधून फक्त एक चौकार निघाला मात्र षटकारापासून दूर राहीला.

आता हाच आकड्यांचा खेळ आजच्या सामन्यातही दिसला तर राजस्थानच्या अडचणी वाढताना दिसतील. त्यामुळे आपोआप मुंबई इंडियन्सचा विजयाचा रस्ता पक्का होईल. तथापि, हेटमायरकडे असलेला नवीनतम फॉर्म महत्त्वाचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT