Shikhar Dhawan Wedding Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: गब्बर पुन्हा बोहल्यावर! शिखर धवन आणि सोफी शाइन अडकले लग्नबंधनात; क्रिकेट विश्वातील दिग्गजांची मांदियाळी

Shikhar Dhawan Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा 'गब्बर' म्हणजेच शिखर धवन याने आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे.

Sameer Amunekar

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा 'गब्बर' म्हणजेच शिखर धवन याने आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. आयशा मुखर्जीसोबतच्या घटस्फोटानंतर शिखरने सोफी शाइन हिच्याशी दुसऱ्यांदा विवाह केला असून, या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या खास क्षणी शिखरला आशीर्वाद देण्यासाठी भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती.

रोहित-रितिकाची उपस्थिती

शिखर धवनच्या या आनंदाच्या क्षणी त्याचा जुना जोडीदार आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या पत्नीसह, रितिका सजदेहसोबत पोहोचला होता. या दोघांचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. रोहितसोबतच भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचे निवडकर्ते आरपी सिंह यांनीही लग्नाला हजेरी लावून नवविवाहित दांपत्याला शुभेच्छा दिल्या. मैदानावरील रोहित-शिखरची जोडी पुन्हा एकदा ऑफ-फिल्ड एकत्र दिसल्याने चाहत्यांना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

सुरेश रैना, इरफान पठाण आणि चहलचा जलवा

'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना आपली पत्नी प्रियंका चौधरीसह या सोहळ्यात सहभागी झाला होता. त्यांच्याशिवाय भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल यांनीही लग्नात हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिखरच्या कप्तानीखाली पंजाब किंग्ससाठी चमकदार कामगिरी करणारा युवा खेळाडू आशुतोष शर्मा हा देखील आपल्या लाडक्या कर्णधाराच्या लग्नात आवर्जून उपस्थित होता.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि इतर मान्यवर

केवळ क्रिकेटपटूच नव्हे, तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही या विवाहात शिरकत केली. त्यांनी शिखर आणि सोफीला शुभेच्छा देतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून या विवाह सोहळ्याची अधिकृत माहिती दिली. या व्यतिरिक्त क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील इतरही अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. शिखर आणि सोफीचे पारंपारिक वेशभूषेतील फोटो पाहून सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT