Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

Shikhar Dhawan: गब्बरची मोठी घोषणा, या दौऱ्यापासून भारत वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु करणार!

Indian Team: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 300 हून अधिक धावा करुनही भारतीय संघ पराभूत झाला.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand ODI Series: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 300 हून अधिक धावा करुनही भारतीय संघ पराभूत झाला. पहिल्या वनडे गोलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. त्याचवेळी पावसामुळे दुसरा आणि तिसरा वनडे रद्द करण्यात आला. सामन्यानंतर कर्णधार शिखर धवन म्हणाला की, 'आमची गोलंदाजीची बाजू कमकुवत आहे.' त्याचबरोबर विश्वचषकाच्या तयारीसाठी त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

धवनने हे वक्तव्य केले

सामन्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला की, 'आम्ही युवा संघ आहोत. नक्कीच, बॉलिंग युनिटकडून अधिक चांगल्या कामगिरीची आपेक्षा आहे. त्यांना गोलंदाजीत जास्त सातत्य ठेवावे लागेल. शॉर्ट आणि बाऊन्सचा जास्त वापर करावा लागेल. या अनुभवांतून युवा गोलंदाज शिकतील.'

एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरु होईल

बांगलादेशमध्ये शिखर धवन कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवणार आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमीच्या पुनरागमनामुळे, डावखुरा सलामीवीर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी लागेल अशी अपेक्षा आहे. सामन्यानंतर धवन म्हणाला की, 'वरिष्ठ खेळाडू बांगलादेशच्या आगामी दौऱ्यावर परततील. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीनुसार हा अधिक व्यावहारिक दौरा असेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT