Shahid Afridi Dainik Gomantak
क्रीडा

Shahid Afridi: 'बंगळुरूमध्ये पाकिस्तानच्या बसवरही दगडफेक झालेली, पण...', आफ्रिदीचा धक्कादायक दावा

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीने 2005 मध्ये पाकिस्तान संघावर दगडफेक झाल्याचा दावा करताना पाकिस्तानने वर्ल्डकप 2023 साठी भारतात जावे की नाही, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Shahid Afridi claimed that Pakistani team bus attacked with stones in Bangalore in 2005: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात होणाऱ्या सामन्यांकडे नेहमीच चाहत्यांचे लक्ष असते. यावर्षी तर क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी आहे. कारण यंदा भारत आणि पाकिस्तान संघात आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धांमध्ये सामने होणार आहेत. त्यामुळे या सामन्यांबद्दल चर्चाही सुरू झाल्या आहेत.

त्यातच काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी म्हटले होते की भारत जर आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तानचा संघही वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही आणि तटस्थ ठिकाणाची मागणी करेल. यावरही अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिदीने 2005 सालची आठवण सांगितली असून त्याने असेही म्हटले आहे की पाकिस्तानने वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जायला हवे.

एका कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकबरोबर असताना आफ्रिदीने 2005 मध्ये बंगळुरूमध्ये झालेल्या कसोटी सामन्याबद्दल सांगितले. या सामन्यानंतर पाकिस्तानच्या बसवर दगडफेक झाल्याचा दावाही त्याने केला.

त्यावेळी कसोटी मालिकेतील मोहाली येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. दुसरा सामना इडन गार्डन्समध्ये भारताने 195 धावांनी जिकंला होता. त्यानंतर बंगळुरूला तिसरा कसोटी सामना झालेला, ज्यात पाकिस्तानने 168 धावांनी विजय मिळवला होता.

आफ्रिदी बंगळुरू कसोटीबद्दल बोलताना म्हणाला, 'तो (भारताचा दौरा) आमच्या कारकिर्दीतील दबावाचा क्षण होता. आम्ही जेव्हा बाऊंड्री मारायचो, तेव्हा कोणीही प्रोत्साहन द्यायचे नाही. जेव्हा आम्ही बंगळुरू कसोटी जिंकलो आणि हॉटलकडे चाललो होतो, तेव्हा आमच्या संघाच्या बसवर दगड फेकण्यात आले होते. तेव्हा दबाव होता, नक्कीच होता पण त्या दबावाचाही आनंद घेता आला पाहिजे.'

'लोक म्हणत आहेत की पाकिस्तानने भारतात गेले नाही पाहिजे, पण याच्या अगदी विरुद्ध आहे. मला वाटते की त्यांनी भारतात जावे आणि जिंकावे.'

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकप 2023 मधील सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्याची ही आठवी वेळ असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT