शाफाली वर्मा Twitter/@BCCIWomen
क्रीडा

शफाली वर्माचे एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय महिला संघात पदार्पण

हरियाणाच्या या मुलीने १७ वर्षीय १५० दिवसांत क्रिकेटच्या सर्वप्रकारात स्थान मिळवले आहे. पदार्पणाच्या सामन्यात शफालीने १४ चेंडूत १५ धावा केल्या.

दैनिक गोमन्तक

इंग्लंड (England) विरुध्द भारतीय महिला क्रिकेट (Indian women's cricket) संघाच्या एक दिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. कसोटी सामन्यात आपल्या खेळाने ठसा अमटविणारी शफाली वर्माने (Shafali Verma) एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय महिला संघात पदार्पण केले आहे. इतक्या कमी वयात संघात पदार्पण करणारी शफाली पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

हरियाणाच्या या मुलीने १७ वर्षीय १५० दिवसांत क्रिकेटच्या सर्वप्रकारात स्थान मिळवले आहे. या आधी अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमानने १७ वर्षे ७८ दिवसांनी सर्व प्रकारात पदार्पण केले होते. त्यानंतर इंग्लंडची सारा टेलरने १७ वर्षे ८६ दिवस, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी १७ वर्षे १०४ दिवस तर पाकिस्तानचा मोहम्मद अमीरने १७ वर्षे १०८ दिवसांत पदार्पण केले होते. त्या यादीत आता शफालीचेही नाव जोडले गेले आहे. शफालीने इंग्लंड विरुध्द झालेल्या कसोटी सामन्यात ६३ चेंडूत धुवाधार ९६ धावा केल्या. पदार्पणातच महिला कसोटी सामन्यात अर्धशतक झळकविणारी सर्वात तरुण फलंदाज ठरली आहे.

पदार्पणाच्या सामन्यात शफालीने १४ चेंडूत १५ धावा केल्या, कॅथरीन ब्रंटने शफालीला बाद केले. इंग्लंड सोबत आजापासून सुरु झालेल्या महिलांच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारतीय महिला संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. भारतीय महिला संघाने आतापर्यंत २४ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या आहेत. यात पूनम राऊत ३० धावांवर तर मिताली राज २० धावांवर खेळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

SCROLL FOR NEXT