Shabnim Ismail
Shabnim Ismail PTI
क्रीडा

WPL 2024: मुंबई इंडियन्सच्या शबनम इस्माईलने लिहिली वेगाची नवी व्याख्या, महिला क्रिकेटमध्ये टाकला सर्वात वेगवान चेंडू

Pranali Kodre

Shabnim Ismail Bowled Fastest Delivery Ever in Women's Cricket

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईलने इतिहास रचला आहे.

या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून इस्माईल खेळते. तिने मंगळवारी प्रथम फलंदाजी करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लॅनिंग विरुद्ध तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ताशी 132.1 किमी वेगाने फेकला. त्यामुळे तिचा हा चेंडू ऐतिहासिक ठरला.

महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने ताशी 130 किमीपेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकला आहे. यापूर्वी कोणाही असा पराक्रम कोणत्याच महिला क्रिकेटपटूने केला नव्हता. त्यामुळे इस्माईलच्या या चेंडूची नोंद इतिहासात झाली आहे.

इस्माईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गेल्यावर्षी निवृत्त झाली आहे. तिने तिच्या कारकिर्दीत 8 महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळल्या आहेत. तिने यापूर्वी 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ताशी 128 किमी वेगाने चेंडू टाकला होता. तसेच 2022 वनडे वर्ल्डकपमध्ये तिने ताशी 127 किमी वेगाने चेंडू टाकला होता.

दरम्यान, इस्माईलने अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात 4 षटकात 46 धावा देत 1 विकेट घेतली. तिच्या संघाला म्हणजेच मुंबई इंडियन्सला या सामन्यात 29 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्सचा पराभव

या सामन्यात जेमिमा रोड्रिग्स आणि लॅनिंग यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात 4 बाद 192 धावा केल्या होत्या. रोड्रिग्सने 33 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी खेळी, तर लॅनिंगने 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली.

त्यानंतर 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सला 20 षटकात 8 बाद 163 धावाच करता आल्या.

त्यांच्याकडून अमनजोत कौरने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. तसेच हेली मॅथ्यूजने 29 आणि एस सजनाने 24 धावा केल्या. यांच्याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून गोलंदाजी कराताना जेस जोनासनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa Today News Live: 'गोवा फॉरवर्ड'चा बुधवारी डिचोलीत जनता दरबार..!

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT