Rizvan Fernandes Dainik Gomantak
क्रीडा

Football Tournament: सेझा अकादमीचा शानदार विजय; रीझव्हन फर्नांडिस ठरला सामनावीर

Football Tournament: बाणावली येथील मैदानावर सेझा अकादमीने चर्चिल ब्रदर्सला 2-1 फरकाने नमवले. सेझा अकादमीला चैतन दाभोळकरने नवव्या मिनिटास आघाडी मिळवून दिली.

किशोर पेटकर

Football Tournament: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी सेझा फुटबॉल अकादमी आणि एफसी गोवा संघाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले.

दरम्यान, बाणावली येथील मैदानावर सेझा अकादमीने चर्चिल ब्रदर्सला 2-1 फरकाने नमवले. सेझा अकादमीला चैतन दाभोळकरने नवव्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. नंतर 58 व्या मिनिटास लुनमिनलेन हाओकिप याने चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधून दिली. 63 व्या मिनिटास जोशुआ डिसिल्वा याच्या गोलमुळे सेझा अकादमीने पुन्हा आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवली.

दुसरीकडे, या विजयामुळे त्यांचे आता नऊ सामन्यांतून 16 गुण झाले आहेत. दहा सामने खेळल्यानंतर चर्चिल ब्रदर्सचे 12 गुण कायम राहिले. एला-जुने गोवे येथील मैदानावर रीझव्हन फर्नांडिस याने 40 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एफसी गोवाने कळंगुट असोसिएशनला 1-0 असे निसटते हरवले. विजयामुळे एफसी गोवाचे 16 गुण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT