Seja Academy team emerged victorious with total of eight goals  Dainik Gomantak
क्रीडा

चुरशीच्या लढतीत सेझा अकादमी सरस

स्पर्धेत आज सोमवारीम्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब व कळंगुट असोसिएशन यांच्यात रंगणार सामना

दैनिक गोमन्तक

पणजी: सेझा फुटबॉल (Football) अकादमीने सामन्याच्या पूर्वार्धात पाच गोल नोंदवून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील (Goa Professional League Football Tournament) मोठ्या विजयाच्या दिशेने कूच केली असता, यूथ क्लब मनोरा संघाने उत्तरार्धात तीन गोल नोंदवून जोरदार प्रतिकार केला. अखेरीस एकूण आठ गोल झालेल्या या लढतीत सेझा अकादमी संघ 5-3 फरकाने विजयी ठरला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर रविवारी सामना झाला. सलग दोन बरोबरीनंतर सेझा अकादमीचा हा पहिलाच विजय ठरला. त्यांचे आता पाच गुण झाले आहेत. सलग दुसऱ्या पराभवानंतर मनोरा संघाचे तीन लढतीनंतर तीन गुण कायम राहिले.

सेझा अकादमीसाठी पहिला गोल ओमकार याने दहाव्या मिनिटास नोंदविला, नंतर विष्णू गोसावीच्या असिस्टवर रिझबनने २२व्या मिनिटास संघाची आघाडी वाढविली. तिसाव्या मिनिटास मायरन परेरा याने केलेल्या गोलमुळे सेझा अकादमीची आघाडी तीन गोलने भक्कम झाली. 36 व्या मिनिटास अमन राजभार याने गोल केल्यानंतर रिझबनने आणखी एक गोल नोंदवून सेझा अकादमीची आघाडी 5-0 अशी मजबूत केली. सामन्याच्या 50व्या मिनिटास ॲनिस्टन फर्नांडिसच्या असिस्टवर रजिंदर याने शानदार हेडिंग साधत मनोरा संघाची पिछाडी कमी केली. नंतर लगेच एल्डन कुलासोने याने मनोरा संघासाठी दुसरा गोल केल्यानंतर जॉयविन कार्नेरो याने संघाची पिछाडी 3-5अशी कमी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT