Journalist Death in FIFA World Cup 2022
Journalist Death in FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: दोन दिवसात दोन पत्रकारांचे निधन, उलट-सुलट चर्चांना उधाण

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेला फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 अखेरच्या टप्प्यात आला आहे. मात्र, हा वर्ल्डकप मैदानातील सामन्यांबरोबरच मैदानाबाहेर घडलेल्या घटनांमुळेही चर्चेत आहे. आता अशी बातमी समोर आली आहे की वर्ल्डकपचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेला एका छाया पत्रकाराचे निधन झाले आहे.

दोन दिवसांपूर्वीच एक अमेरिकन पत्रकार ग्रँड वाहल याचेही वर्ल्डकपमधील सामन्याचे वार्तांकनासाठी गेला असताना निधन झाले. त्यानंतर दोनच दिवसात दुसऱ्या पत्रकाराचेही निधन झाल्याच्या बातमीने खळबळ माजवली आहे. या घटनांमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहेत.

निधन झालेल्या छाया पत्रकाराचे नाव खालिज अल-मिस्लाम असे होते. त्यांच्या निधनाबद्दल कतार न्यूज आऊटलेटने माहिती दिली की, 'कतारचे एल-मिस्लाम यांचे फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे वार्तांकन करत असताना अचानक निधन झाले. अल्लाह त्यांच्यावर दया करेल आणि माफी देईल. आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करतो.'

दरम्यान अल-मिस्लाम यांच्या निधनामागील नक्की काय कारण आहे, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

ग्रँड वाहलच्या मृत्यूबाबत उलट-सुटल चर्चा

यापूर्वी ग्रँट वाहल यांच्या निधनानंतर अनेक चर्चांना सुरूवात झाली होती. ग्रँट वाहलचे निधन नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्यातील सामन्यादरम्यान अचानक खुर्चीवरून पडून झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांच्याबाबत काही विवादात्मक घटना घडल्या असल्याने त्यांच्या निधनाबद्दल चर्चा सुरू आहेत.

ग्रँट वाहल यांनी फिफा वर्ल्डकपच्या एका सामन्यावेळी रेनबो टी-शर्ट घातला होता. रेनबो टी-शर्ट LGBTQ समुदायाचे समर्थनासाठी वापरले जातात. पण, याबद्दल त्यांना कतारच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काहीवेळाने सोडूनही देण्यात आलेले. कतारमध्ये समलैंगिकता या विषयाबाबत अनेक कडक नियम आहेत. त्यामुळे त्याला समर्थन देण्याबद्दल कारवाईही केली जाते.

दरम्यान, याच गोष्टींमुळे ग्रँड वाहल यांच्या भावाने आरोप केला आहे की ग्रँट यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच त्यांनी म्हटले होते की तो निरोगी होता, त्याचे असे निधन होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी.

यजमान कतार विवादात

फिफा वर्ल्डकप 2022 यजमानपद स्विकारल्यानंतर कतार अनेकदा वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी असेही वृत्त चर्चेत होते की कतारमध्ये फिफा वर्ल्डकपच्या आयोजनासाठी आलेल्या कामगारांपैकी 65 टक्के कामगारांचा मृत्यू झाला आहे. पण त्यांच्या मृत्यूबाबतही कतार सरकारने माहिती लपवली आहे. कतार सरकारने सांगितले लाखो लोकांपैकी की केवळ 400-500 लोकांचेच मृत्यू झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

SCROLL FOR NEXT