Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचा शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी, शिरोडा, आणि बेतोडा निरंकाल या चारही गावांतून प्रचा केल्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती आली.
Minister Subhash Shirodkar
Minister Subhash ShirodkarDainik Gomantak

Loksabha Election 2024 :

शिरोडा, लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे या शिरोडा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून विजयी होणार आहेत, असे शिरोडाचे आमदार तथा जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचा शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी, शिरोडा, आणि बेतोडा निरंकाल या चारही गावांतून प्रचा केल्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती आली.

आणि सर्वच भाजप कार्यकर्ते उमेदीने कार्य करू लागले. शिरोडा भाजपमंडळ तर्फे अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, शिरोडा सरपंच पल्लवी शिरोडकर, बोरी सरपंच सतीश नाईक, बेतोडा निरंकाल सरपंच मधू खांडेपारकर, पंचवाडी सरपंच लीना फर्नांडिस, जि.प. सदस्य नारायण कामत आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रचाराला जोर धरला. शिरोडा मतदारसंघातील चारही गावात ठिकठिकाणी कोपरा बैठका घेणे चालूच आहे.

Minister Subhash Shirodkar
Aryan Khan Goa Shoot: एसआरकेच्या लेकाचं गोव्यात 'स्टारडम' शूट; अभिनेत्री मोना सिंगही साकारणार भूमिका

चारही पंचायतींत प्रचार

मतदारसंघातील चारही पंचायतीतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य या प्रचार कार्यात गुंतले आहे. शिरोडाच्या माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमती नाईक, भारती शिरोडकर, बोरीच्या माजी सरपंच नूतन नाईक, रश्‍मी नाईक, किरण नाईक सारख्या कार्यकर्त्या पल्लवी धेंपे यांच्या व्हिजनासाठी कार्यरत आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी शिरोडा मतदारसंघात भाजपचे कमळ हे फुलणार आहेच व पल्लवी धेंपे या बहुसंख्य मतांनी विजयी होतील असा विश्‍वास सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com