Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Vasco News : लोकसभा निवडणुकीच्‍य अनुषंगाने कॅप्टन फर्नांडिस यांची जाहीर सभा कुठ्ठाळी-कासावली मार्केटमध्ये पार पडली. यावेळी ते बोलत होते.
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomantak

Vasco News :

वास्को, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील जनतेला दिलेल्या आश्‍‍वासनांची पूर्तता गेल्या दहा वर्षांत केलीच नाही. गोव्याला खास दर्जा देण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

गोव्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून मुरगाव पत्तन प्राधिकरणाला (एमपीए) कोळसा हाताळणी करू देण्‍याचे षडयंत्र केंद्र सरकारने रचले आहे, असा आरोप दक्षिणेतील ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्‍य अनुषंगाने कॅप्टन फर्नांडिस यांची जाहीर सभा कुठ्ठाळी-कासावली मार्केटमध्ये पार पडली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई,

गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नियाजी शेख, गोवा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष माजी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, अखिल गोवा काँग्रेस समितीचे सदस्य गिरीश चोडणकर, माजी पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा, काँग्रेस नेते ओलेन्‍सियो सिमॉईश, वोरविल दोरादो, ‘रापणकार एकवोट’चे आग्नेलो रॉड्रिगीस, सावियो डिसिल्वा उपस्थित होते.

आरजीने ‘इंडिया’ आघाडीची चिंता वाढविली आहे. भाजपने मुद्यामहून आरजीच्‍या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत उतरविलेले आहे. कारण भाजपला एका समाजाची मते आपल्‍याकडे वळवायची आहेत. आरजीला आपली ‘बी’ टीम म्हणून भाजपने निवडणुकीत उतरविले आहे, असा आरोप - आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

ओलेन्‍सियो सिमॉईश म्हणाले की, येथील जंगले, पूर्वजांची घरे, समुद्र, नद्या नष्‍ट करण्‍याचे काम सरकार करत आहे. या सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत हद्दपार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

केंद्रातील व राज्‍यातील भाजप सरकार जनहितविरोधी आहे. या सरकारने घेतलेले सर्व निर्णय जनतेच्‍या विरोधातच गेले आहेत. त्‍यामुळे प्रत्‍येकवेळी जनतेला सरकारविरोधात आंदोलने करावी लागली. भविष्‍यात यातून सुटका पाहिजे असेल तर या सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगलीच अद्दल घडवून ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेवर आणा.

- कॅ. विरियातो फर्नांडिस, उमेदवार (इंडिया आघाडी)

Viriato Fernandes
Aryan Khan Goa Shoot: एसआरकेच्या लेकाचं गोव्यात 'स्टारडम' शूट; अभिनेत्री मोना सिंगही साकारणार भूमिका

भाजपकडून मतांसाठी धर्माचे राजकारण : युरी

भाजप सरकार मतांसाठी धर्माचे राजकारण करत आहे. अशा सरकारमुळे भविष्यात धार्मिक सलोखा बिघडू शकतो. म्‍हणूनच जनतेने आपले मत ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांना देऊन लोकशाही आणखी बळकट करण्‍यासाठी सहकार्य करावे. भाजप सरकारच्‍या काळात महागाई शिगेला पोहोचली आहे.

सर्वसामान्‍य जनता महागाईच्‍या वणव्‍यात होरपळत आहे. गरिबांना तर जीवन जगणे मुश्‍‍कील झाले आहे. यातून बाहेर येण्‍यासाठी भाजप सरकारला हद्दपार करून ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेवर आले पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com