Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

UAE Heavy Rain: मुसळधार पाऊस आणि वादळामुळे यूएईमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. UAE मध्ये गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
Heavy Rainfall in UAE
Heavy Rainfall in UAEDainik Gomantak
Published on
Updated on

UAE Heavy Rain: मुसळधार पाऊस आणि वादळामुळे यूएईमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. UAE मध्ये गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच डझनभर उड्डाणे रद्द करण्यात आली. इंटरसिटी बससेवाही बंद करण्यात आली. ऑफिसमध्ये जावून काम करणाऱ्या लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या दुबईत मुसळधार पाऊस आणि वादळाने थैमान घातले आहे. दुबईच्या सर्व भागात मुसळधार पावसासह जोरदार वादळाने हाहाकार माजवला आहे. यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

गल्फ न्यूज आणि खलीज टाईम्सच्या मते, गेल्या काही दिवसांपासून UAE मुसळधार पावसाचा सामना करत आहे. दुबईत पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण शहरात सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुले शिकत आहेत. त्याचबरोबर कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरुनच काम करु देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्याने आणि समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. यासोबतच, विमानतळ आणि विमान कंपन्याही अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज तात्काळ प्रभावाने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. रस्त्यांवरील वाहतूकही बंद करण्यात आली.

Heavy Rainfall in UAE
Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

दुबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु झाला

नॅशनल सेंटर ऑफ मेटिऑरॉलॉजी (NCM) ने जारी केलेल्या अलर्टनुसार, मध्यरात्रीपासून UAE मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दुबईत (Dubai) आज पहाटे 2.35 वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. आता पुढील 48 तासांसाठी मोठा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला देशात झालेल्या अभूतपूर्व पावसापेक्षा येत्या दोन दिवसांत पाऊस कमी होईल असे सांगण्यात येत आहे. जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलांचे शिक्षण ऑनलाइन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com