Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Cashew Farmer : गोव्यात काजू बियांना किलोमागे ११४ रुपये दर मिळतो. तर, सरकारची आधारभूत किंमत १५० रुपये एवढी आहे.
Goa Cashew Farmers
Goa Cashew FarmersDainik Gomantak
Published on
Updated on

Cashew Farmer :

मडगाव, हवामानातील बदल आणि अवेळी पडलेला पाऊस यामुळे यंदा राज्यातील काजूचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. परिणामी तब्बल १६ हजार बागायतदार आणि छोटे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

सर्व सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याने या बागायतदारांच्‍या व्यथांकडे लक्ष देण्यास कुणालाही सवड नाही.

‘आदर्श कृषी संस्था’ ही गोव्यातील सर्वांत मोठी काजू खरेदी करणारी संस्था. या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री प्रकाश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीच काजूच्‍या बियांना मिळणारा अल्‍प दर आणि त्यात निम्म्यावर आलेले उत्पादन यामुळे सामान्य बागायतदार मेटाकुटीला आला आहे.

म्‍हणूनच आम्‍ही राज्यात काजू दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

गोव्यात काजू बियांना किलोमागे ११४ रुपये दर मिळतो. तर, सरकारची आधारभूत किंमत १५० रुपये एवढी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कृषीकार्ड आहे, त्यांनाच ही आधारभूत किंमत मिळते. विशेष म्‍हणजे १६ हजार शेतकऱ्यांपैकी अवघ्या २ हजार शेतकऱ्यांकडेच कृषीकार्ड आहे, असे वेळीप म्‍हणाले.

दरवर्षी वन खाते लिलावाद्वारे काजू घेताना दहा टक्के वाढीव दर देते. मात्र यंदा ही शक्‍यता कमी आहे. कारण काजू पीक अर्ध्याने घटले आहे. वन खाते कागदावर काजूची लागवड करते, प्रत्यक्षात काहीच नाही. त्‍यातच काजूचा दर खूप खाली आल्‍याने ताळमेळ जुळत नाही. पुढच्या वर्षी मोफत काजू दिले तरीही नुकसान भरून येणार नाही.

- सयाजी देसाई, बागायतदार (नेत्रावळी)

Goa Cashew Farmers
Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

आम्ही अलीकडेच शेतकऱ्यांचा एक मेळावा आयोजित करून त्‍यांच्‍या समस्‍या सरकारसमोर मांडल्या. ज्यांच्याकडे कृषीकार्ड नाही, त्यांनाही आधारभूत किंमत द्यावी, अशी आमची मागणी आहे. पण सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्‍याने सरकार कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळेच आमची मागणी रखडली आहे.

- प्रकाश वेळीप,

अध्‍यक्ष (आदर्श कृषी संस्था)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com