Dayalan Hemalatha | WPL 2024 X
क्रीडा

GG vs DC: गुजरातला चालू सामन्यातच बदलावा लागला खेळाडू, WPL मध्ये पहिल्यांदाच झाला 'या' नियमाचा वापर

Concussion Substitute: वूमन्स प्रीमियर लीगच्या सामन्यात गुजरात जायंट्सला पहिल्यांदाच सामन्यादरम्यान खेळाडू बदलण्यात आला.

Pranali Kodre

Sayali Satghare becomes first concussion substitute in the Women's Premier League

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात बंगळुरूला सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने 25 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात डब्ल्युपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच कन्कशन सब्स्टिट्युटचा नियम वापरण्यात आला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात जेस जोनासनने मारलेल्या मोठ्या फटक्यावर गुजरातची दयालन हेमलता झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाली. ती झेल घेताना चुकल्याने चेंडू तिच्या डोक्याला लागला.

त्यामुळे लगेचच फिजिओ मैदानात आले होते. त्यानंतर ते तिला बाहेर घेऊन गेले. ती बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या डावात तिच्या जागेवर कन्कशन सब्स्टिट्युट म्हणून गुजरातने सायली सतघरे हिला संघात स्थान दिले. त्यामुळे सायली डब्ल्युपीएलमध्ये कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळणारी पहिली खेळाडू ठरली.

संघाला कन्कशन सब्स्टिट्यूट तेव्हाच घेता येतो, जेव्हा संघातील खेळाडूला मैदानात असताना डोक्याला किंवा मानेला दुखापत होते.

दरम्यान सायली सब्स्टिट्युट म्हणून 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरली. तिने नाबाद 7 धावा केल्या.

खरंतर सायली डब्ल्युपीएल 2024 च्या लिलावात अनसोल्ड राहिली होती. परंतु, काशवी गौतम दुखापतीमुळे बाहेर झाल्याने तिच्या जागेवर सायलीला संधी मिळाली. काशवीला गुजरातने 2 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तसेच सायलीची मुळ किंमत 10 लाख रुपये होती.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 163 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून मेल लॅनिंगने 55 धावांची खेळी केली. तसेच गुजरातकडून मेघना सिंगने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 20 षटकात 8 बाद 138 धावाच केल्या. गुजरातकडून ऍश्ले गार्डनर हिने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तिच्याव्यतिरिक्त आणखी काही करता आले नाही. दिल्लीकडून जेस जोनासन आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT