Satwiksairaj Rankiredd & Chirag Shetty  Dainik Gomantak
क्रीडा

French Open Badminton: सात्विक-चिराग जोडीने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकली फ्रेंच ओपन

French Open Badminton 2022: भारताचा स्टार शटलर सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इतिहास रचला आहे.

दैनिक गोमन्तक

French Open Badminton 2022: भारताचा स्टार शटलर सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इतिहास रचला आहे. या भारतीय शटलर्संनी मिळून फ्रेंच ओपन बॅडमिंटनचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकणारे सात्विक आणि चिराग हे पहिले भारतीय ठरले आहेत. पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात या जोडीने चायनीज-तैपेईच्या खेळाडूंवर सरळ गेममध्ये विजय नोंदवला.

मोठे करिअर

सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankiredd) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या स्टार भारतीय जोडीने रविवारी आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद आपल्या नावावर केले. या जोडीने पॅरिसमधील (Paris) फ्रेंच ओपन बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या लु चिंग याओ आणि यांग पो हान यांचा सरळ गेममध्ये पराभव केला. 2019 मध्ये उपविजेते ठरलेल्या या जोडीने 48 मिनिटांच्या लढतीत लू आणि यांग यांचा 21-13, 21-19 असा पराभव केला.

चिराग-सात्विक जबरदस्त फॉर्मात

भारताच्या (India) या पुरुष जोडीने यंदाही आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत चिराग-सात्विकने कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय त्यांनी इंडियन ओपन सुपर 500 चे विजेतेपद, कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) गोल्ड आणि थॉमस कप जिंकले.

विजेतेपदाचा मार्ग सोपा नव्हता

या भारतीय जोडीने सुरुवातीच्या गेममध्ये 5-0 अशी आघाडी घेत चांगली कामगिरी सुरु ठेवली होती. चायनीज तैपेईच्या खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला असला तरी सात्विक-चिराग जोडीने पहिला गेम 21-13 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चुरशीची स्पर्धा झाली. सुरुवातीला चायनीज तैपेई जोडीने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यंतरापर्यंत स्कोर भारताच्या बाजूने राहिला होता. दुसऱ्या गेममध्ये चायनीज तैपेईच्या खेळाडूंनी 14-14 आणि नंतर 19-19 अशी बरोबरी साधली, मात्र सात्विक-चिरागने वेग कायम ठेवत गेम आणि सामना 21-19 असा बरोबरीत आणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT