Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty X/bwfmedia
क्रीडा

Malaysia Open 2024: सात्विक-चिराग शेवटपर्यंत झुंजले, पण चीनच्या जोडीनं फायनलचं मैदान मारत जिंकलं विजेतेपद

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty: मलेशिया ओपन 2024 स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकिरेड्डी या भारतीय बॅडमिंटन जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

Pranali Kodre

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty lost doubles final to Wang Chang - Liang Weikeng at Malaysia Open 2024:

भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना रविवारी (14 जानेवारी) मलेशिया ओपन 2024 स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिराग यांना अंतिम सामन्यात चीनच्या वँग चँग आणि लियांग वेईकेंग यांनी 21-9, 18-21, 17-21 अशा तीन सेटमध्ये पराभूत केले.

चँग आणि वेईकेंग यांची जोडी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे अंतिम सामना क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील जोड्यांमध्ये असल्याने चुरशीचा होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. त्याचनुसार हा सामना झालाही.

पहिल्या गेममध्ये सात्विक आणि चिराग यांनी दणक्यात सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या गेमध्ये पूर्ण वर्चस्व ठेवले होते. त्यामुळे त्यांनी हा गेम तब्बल 21-9 अशा मोठ्या फरकाने जिंकला होता.

मात्र, त्यानंतर चीनच्या जोडीने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या गेममध्ये सुरवातीलाच मिळवलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. तरी दुसऱ्या गेममध्ये चिराग आणि सात्विकने पुनरागमनाचे अनेक प्रयत्न केले. मात्र हा गेम 18-21 असा जिंकून चँग वेइकेंग यांनी सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेमकडे गेला.

निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 10-3 अशी आघाडीही मिळवली होती. मात्र, पुन्हा एकदा चीनच्या जोडीने पुनरागमन करण्यात यश मिळवले. त्यांनी आक्रमक खेळत 12-12 अशी बरोबरी या गेममध्ये साधली.

त्यानंतर त्यांनी त्यांचा खेळ उंचावत नेला. अखेर त्यांनी अखेरीस 16-20 अशी आघाडी घेत 4 मॅच पाँइंट्स मिळवले. त्यानंतर चिराग आणि सात्विकने एक मॅच पाँइंट वाचवला, मात्र नंतर त्यांना सामना वाचवता आला नाही आणि चीनच्या जोडीने तिसरा गेम 17-21 असा जिंकत विजेतेपदावरही नाव कोरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT