National Sports Awards: सात्विक-चिरागला खेलरत्न, तर शमी-ओजससह 26 जणांना अर्जुन, राष्ट्रपती भवनात रंगला पुरस्कार सोहळा

National Sports Awards: मंगळवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 सोहळा पार पडला.
Mohammed Shami
Mohammed ShamiX
Published on
Updated on

National Sports Awards ceremony at Rashtrapati Bhawan:

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा मंगळवारी (9 जानेवारी) राष्ट्रपती भवनात झाला. या सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यंदा मेजर ध्यानचंद खेलरत्न या भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी बॅडमिंटन कोर्ट गाजवणारी पुरुष दुहेरीतील जोडी सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची निवड झाली आहे.

या दोघांनीही 2023 मध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यांची जोडी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर आली होती. तसेच त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याबरोबरच आशियाई चॅम्पियनशीपचे विजेतेपदही जिंकले.

त्याचबरोबर इंडोनेशिया सुपर 1000, कोरिया सुपर 500, स्विस सुपर 500 अशा काही स्पर्धाबी दिंरल्या. त्यांनी 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप, थॉमस कप या स्पर्धांचेही विजेतेपद जिंकले आहे. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

यापूर्वी पुलेला गोपिचंद, सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू या बॅडमिंटनपटूंना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे सात्विक आणि चिराग यांचे नावही या यादीत जोडले गेले.

Mohammed Shami
ICC Awards 2023: सर्वोत्तम कसोटीपटूसाठी भारताच्या एकमेव खेळाडूला नामांकन, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडूही शर्यतीत

26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

याशिवाय मंगळवारी 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही समावेश आहे. शमीने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 3 सामन्यात पाच विकेट्स घेण्याचाही कारनामा केलेला. त्याने आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटसाठी भरीव योगदान दिले आहे.

त्याच्याशिवाय काही दिवसांपूर्वीच ग्रँडमास्टर पुरस्कार पटकावणारी आर वैशाली हिलाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तिरंदाजीत आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळेलाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ऍथलेटिक्समध्ये नवे विक्रम करणाऱ्या पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर यांचेही नाव पुरस्कार विजेत्यांमध्ये होते.

प्रशिक्षकांचाही सन्मान

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचाही गौरव या सोहळ्यात करण्यात आला. प्रशिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाच प्रशिक्षकांची निवड झाली होती.

याशिवाय क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कबड्डीपटू कविता, बॅडमिंटनपटू मंजुषा कंवर, हॉकीपटू विनीत कुमार शर्मा यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Mohammed Shami
IND W vs AUS W: तितासचा भेदक मारा, स्मृती-शफालीची शानदार बॅटिंग; पहिल्या T20 सामन्यात कांगारुंचा दारुण पराभव

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 विजेते

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार : मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (अंध क्रिकेट) ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (ऍथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (अश्वस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (नेमबाजी), अंतीम पंघल (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), इशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश), सुनील कुमार (कुस्ती), नाओरेम रोशिबिना देवी (वुशू), प्राची यादव (पॅरा केनोइंग), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो).

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार: कविता (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन) आणि विनीत कुमार शर्मा (हॉकी).

द्रोणाचार्य पुरस्कार: गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आर.बी. रमेश (बुद्धिबळ) आणि शिवेंद्र सिंग (हॉकी).

मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी 2023: गुरु नानक देव युनिवर्सिटी, अमृतसर (विजेते), लवली प्रोफेशनल युनिवर्सिटी, पंजाब (पहिले उपविजेते), कुरुक्षेत्र विश्वविद्यालय (दुसरे उपविजेते)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com