Masters Badminton स्पर्धेत 75+ वयोगट मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकलेल्या सतीश कुडचडकर व सिक्लेटिका रिबेलोसह सचिव संदीप हेबळे व प्रशिक्षक विनायक कामत दैनिक गोमन्तक
क्रीडा

Masters Badminton स्पर्धेत गोव्याच्या सतीश-सिक्लेटिकास सुवर्णपदक

डॉक्टर जोडीची 75+ वयोगट मिश्र दुहेरी अंतिम लढतीत बाजी

Dainik Gomantak

Masters Badminton: गोव्याच्या सतीश कुडचडकर आणि सिक्लेटिका रिबेलो या डॉक्टर जोडीने अपेक्षांना जागताना अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत (All India Masters Qualifying Badminton Tournament) 75+ वयोगटात मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले (Mix Double Winner).

मिश्र दुहेरीत सतीश व सिक्लेटिका जोडीने वझीरचंद गोयल आणि उषा शर्मा जोडीवर चुरशीच्या लढतीत 20-22, 21-14, 21-12 फरकाने मात केली. स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. सतीश व सिक्लेटिका यांनी यापूर्वीच स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी (World Masters Qualifying Badminton Tournament) पात्रता मिळविली आहे.

सतीश याने 75+ वयोगटातील पुरुष एकेरी आणि दुहेरीतही अंतिम फेरी गाठली, पण दोन्ही गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सतीश याला सुदाम शहारे याच्याकडून 13-21, 23–25 अशी हार पत्करावी लागली. पुरुष दुहेरीत आल्फ्रेड ख्रिस्तियन सतीशचा सहकारी होता. त्यांना अव्वल मानांकित सुरेश हेगडे व मोहन श्रीवास्तव यांच्याकडून चुरशीच्या लढतीत 18-21, 17-21 पराभव पत्करावा लागला.

गोव्याच्या अन्य खेळाडूंचीही चमक

मिश्र दुहेरीच्या 70+ वयोगटात गोव्याच्या हिलॅरियो फर्नांडिस व मॅलेक्विना फर्नांडिस जोडीस रौप्यपदक मिळाले. त्यांना अंतिम लढतीत अव्वल मानांकित राकेश शर्मा व माया चावत जोडीकडून 21-8, 21-3 अशी हार स्वीकारावी लागली. 70+ वयोगटात गोव्याच्या मुक्ता आगशीकर हिला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अव्वल मानांकित माया चावत हिच्याकडून 21-10, 21-8 असा पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीतही मुक्ता हिला भारती हेबळे हिच्यासह रौप्यपदक मिळाले. पुरुषांच्या 65+ वयोगटात गोव्याचा तानाजी सावंत पुरुष एकेरीत ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. त्याचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्याला अव्वल मानांकित अनिल मितल याने हरविले. गोव्याचे सर्व पदक विजेते खेळाडू स्पेनमधील जागतिक सीनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

"गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक विनायक कामत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले दहा दिवसीय शिबिर फलदायी ठरले हे गोमंतकीयांच्या कामगिरीने सिद्ध झाले आहे. गोव्याच्या खेळाडूंनी समर्पित वृत्तीने मेहनत घेतली. स्पर्धेच्या इतिहासात गोव्याला प्रथमच इतकी पदके मिळाली आहे. त्यामुळे साऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन."

-संदीप हेबळे, सचिव गोवा बॅडमिंटन असोसिएशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT