Senior Veteran National Badminton Championship Dainik Gomantak
क्रीडा

Senior Veteran National Badminton Championship : सतीश कुडचडकर दुहेरीत ब्राँझ मानकरी

कुडचडकर व एम. डी. मुरली जोडीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात

किशोर पेटकर

गोव्याच्या डॉ. सतीश कुडचडकर याने 45व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन्स) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत 75+ वयोगटात पुरुष दुहेरीचे ब्राँझपदक मिळविले. कुडचडकर व सहकारी कर्नाटकचा एम. डी. मुरली जोडीचे आव्हान शनिवारी उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. कुडचडकर व मुरली जोडीवर उत्तराखंडच्या विद्याभूषण अरोरा व मोहन श्रीवास्तव जोडीने 21-15, 21-19 असा विजय नोंदविला. पुरुष दुहेरीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले, तरी सतीश कुडचडकरला आणखी दोन पदकांची संधी आहे.

75+ वयोगटात पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठताना कुडचडकरने राजस्थानच्या रतनलाल मारु याला 21-16, 21-7 असे हरविले. मिश्र दुहेरीतही अंतिम फेरी गाठताना कुडचडकर व कर्नाटकच्या गौरम्मा वीरलिंग जोडीने राजस्थानच्या भूपालसिंग चावत व माया चावत जोडीला 21-11, 21-7 असे नमविले.

महिलांच्या 55+ वयोगटातील दुहेरीत गोव्याचे पदक निश्चित आहे. डॉ. मंजू खांडेपारकर हिने तमिळनाडूच्या सुनिता स्वामिनाथन हिच्या साथीत उपांत्य फेरीत गाठली. त्यांनी स्वाती रेगे (छत्तीसगड) व सुकेशा सग्गी (उत्तर प्रदेश) जोडीला उपांत्यपूर्व लढतीत 21-11, 21-10असे हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT