Basavaraj Bommai : कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कर्नाटकात विजय संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावत रोड शो केला तसेच निवडणूक सभेला संबोधित केले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले. या यात्रेला राज्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन महिन्यांतील हा सातवा कर्नाटक दौरा आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी केली आहे. खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही निवडणूक प्रचारासाठी हजेरी लावली होती. कर्नाटकात बेंगळुरू, बेळगाव, बागलकोट, बिदर आणि बेल्लारी असे 5 जिल्हे येतात. यामध्ये एकूण 72 जागा आहेत.
दरम्यान या विजय संकल्प यात्रेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कळसा भांडूरा प्रकल्पावरील आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. यावरुन बोम्मईंनी गोव्याच्या जखमेवर मीठ चोळल्याचे दिसून येते. दावणगेरीतील विजय संकल्प यात्रेत बोम्मईंनी पुनरुच्चार केला.
"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्राने कर्नाटकातील सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला आहे. यावरून पंतप्रधान मोदींचे कर्नाटकावरील प्रेम दिसून येते. कळसा भांडूरा प्रकल्पाचा डीपीआर मंजूर झाला आहे. आम्ही लवकरच निविदा काढू आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू" असा पुनरुच्चार बोम्मईंनी केला आहे.
कर्नाटकच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 1000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रकल्पांना परवानगी दिल्याबद्दल यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.