Sapna Gill | Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw - Sapna Gill Controversy: पृथ्वी शॉला मोठा दिलासा! सपनाने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांबाबत पोलीस म्हणाले...

Pranali Kodre

Prithvi Shaw - Sapna Gill Controversy: भारतीय क्रिकेट संघाचा 23 वर्षीय सलामीवीर पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांमध्ये मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील गोष्टींमुळे अधिक चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिल आणि तिच्या मित्रांबरोबर मोठा वाद झाला होता. हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले होते.

दरम्यान, या प्रकरणात आता पृथ्वी शॉ याला दिलासा मिळाला आहे. मीडियातील अनेक रिपोर्ट्सनुसार पोलिसांच्या म्हणण्यासानुसार तपासानंतर सपनाने शॉविरुद्ध केलेल्या तक्रारी खोट्या असल्याचे उघड झाले आहे. तिच्या तक्रारींना पाठिंबा देणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. याबद्दल पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील एका हॉटेल बाहेर पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यातील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, हा वाद सेल्फीवरून सुरू झाल्याचे समजले होते.

या प्रकरणानंतर शॉ याने आधी सपना आणि तिच्या मित्रांविरुद्ध त्याच्यावर हल्ला करण्याची तक्रार केली होती. त्यानंतर सपना आणि तिच्या मित्रांना अटक करण्यात आली होती.

पण त्यांना जामीन मिळाल्यानंतर सपना हिने अंधेरी कोर्टात शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादवविरुद्ध विनयभंगाची आणि बेसबॉल बॅटने हल्ला करण्याचा आरोप केला होता.

दरम्यान पोलांसांना तिने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांना सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले आहे की त्यांना कोणतेही पुरावे मिळाले नसून सपना गिलने केलेले आरोप खोटे आहेत.

तसेच त्यांनी ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली, त्या हॉटेलमधील स्टाफचाही जबाब नोंदवला आहे. स्टाफ सदस्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने सपनाला मी आता त्याचे काय करते ते पाहा, असे म्हणताना ऐकले होते.

त्यानंतर सपना आणि तिचे मित्र बाहेर गेले. त्याच्यानंतर साधारण अर्धातासाने शॉ आणि त्याचे मित्रही हॉटेलमधून बाहेर गेले. तसेच स्टाफमधील सदस्याने असेही सांगितले की शॉ याने सपनाबरोबर 15 फेब्रुवारीला कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केले नव्हते.'

तसेच असेही समोर आले आहे की पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे की सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर असे दिसत आहे की सपना आणि तिचा मित्र शोबित ठाकूर नशेत नाचत होते. तसेच शोबितला शॉचा व्हिडिओ काढायचा होता. पण शॉ याने यासाठी नाकारले होते. तसेच पोलिसांनी अनेही सांगितले आहे की फुटेजमध्ये शॉ किंवा अन्य कोणी सपनाबरोबर कोणतेही गैरवर्तन केल्याचे दिसत नाही.

दरम्यान, असे समजत आहे की सध्या हे प्रकरण कोर्टात असून 28 जूनपर्यंत सुनावणी स्थगित केलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलीसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

SCROLL FOR NEXT