sanju samson meet Rajinikanth Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson Meet Rajinikanth: 'तब्बल 21 वर्षांनंतर तो दिवस आलाच...' संजू सॅमसनचा थलायवाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

या दोघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Sanju Samson Meet Rajinikanth Video: टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मिडियावर त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग देखील आहे.

त्याच्या चाहत्यांसह तो नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. आता त्याने एक नवा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. संजूने सुपरस्टार रजनीकांतसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला असुन चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हा फोटो शेअर करत संजूने लिहिले की, “मी रजनीकांतचा चाहता होतो... वयाच्या 7 व्या वर्षी मी माझ्या आई-वडिलांना सांगितले होते की, एके दिवशी मी रजनी सरांना त्यांच्या घरी जावून भेटेन. 21 वर्षांनंतर तो दिवस आला आहे. थलायवाने मला त्यांच्या घरी भेटायला बोलावले आहे.”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान मिळू शकते. वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहे.

संजूने शेवटचा वनडे नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. श्रेयस अय्यरच्या जागी संजूचा संघात समावेश केला जाऊ शकतो. सुंजने आतापर्यंत एकूण 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT