Sanju Samson 89 vs England Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson: 8 चौकार, 7 षटकार... संजू सॅमसन 'ऑन फायर'! इंग्लंडच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, कोहलीच्या या 'विराट' विक्रमाशी केली बरोबरी

Sanju Samson 89 vs England: इंग्लंडविरुद्धच्या बाद फेरीच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sameer Amunekar

इंग्लंडविरुद्धच्या बाद फेरीच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात सर्वांत जास्त चमकला तो म्हणजे संजू सॅमसन. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र्यात असलेल्या संजूने इंग्लिश गोलंदाजांना मैदानावर चोहोबाजूंनी चोपले. केवळ ४२ चेंडूंमध्ये ८९ धावांची खेळी करत त्याने भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवले. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश होता, ज्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट २११ च्या घरात पोहोचला होता.

विराट कोहलीच्या 'त्या' ऐतिहासिक खेळीची पुनरावृत्ती

संजू सॅमसनने या धडाकेबाज कामगिरीसह भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा मान आता विराटसोबत संजूलाही मिळाला आहे.

विराटने २०१६ च्या उपांत्य फेरीत ८९ धावांची खेळी केली होती. आज संजूने नेमक्या तेवढ्याच धावा करून इतिहास रचला. विशेष म्हणजे संजूचा धावा करण्याचा वेग (स्ट्राइक रेट) विराटच्या तुलनेत अधिक होता, ज्यामुळे इंग्लंडच्या गोटात घबराट पसरली होती.

भारतीय संघाने केवळ संजूच्या जोरावरच नव्हे, तर सांघिक कामगिरीच्या जोरावर २० षटकांत २५३ धावांचा डोंगर उभा केला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

संजूला इशान किशन (१८ चेंडूंत ३९ धावा) आणि शिवम दुबे (२५ चेंडूंत ४३ धावा) यांनी मोलाची साथ दिली. शिवम दुबेने मारलेले षटकार प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरले. यासह भारतीय संघ टी-२० मध्ये दोनदा २५० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.

षटकारांचा पाऊस

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी एकूण १९ षटकार ठोकले, जो एका डावात कोणत्याही संघाने मारलेला सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांच्या आक्रमणापुढे पूर्णपणे हतबल दिसले. सुरुवातीच्या पॉवरप्लेपासूनच भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे इंग्लंडची रणनीती पूर्णपणे कोलमडली. संजू सॅमसनची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली असून, त्याने टीकाकारांना आपल्या बॅटनेच चोख उत्तर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT