Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

'विराटला फ्रंटफूटवर राहायचे, म्हणून..., संजय मांजरेकरांच कोहलीच्या बॅटींगवर ट्विट

दैनिक गोमन्तक

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royal) क्वालिफायर दोन मध्ये बेंगळुरूला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. बंगळुरूचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) केवळ 7 धावा करून आउट झाला. प्रसिद्ध कृष्णाने कोहलीला पुन्हा आउट केले जसे तो भारतीय माजी कर्णधारला आउट करत होता. खरंतर विराट पुन्हा एकदा झेलबाद आउट झाला. (Sanjay Manjrekar has tweeted about Virat Kohli batting)

यावेळी यष्टिरक्षक संजू सॅमसनने त्याचा कॅच घेतला. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी कोहलीच्या आऊट होण्यावरून ट्विट केले आहे. मांजरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये कोहलीच्या टेक्निकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मांजरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'विराटला फ्रंटफूटवर राहायचे आहे, त्यामुळे त्यात काही फरक होत नाही. मानसिक कणखरपणा तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो, तांत्रिक त्रुटींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. क्रंच गेम.. फ्रंट फूटपासून शॉर्ट लेंथपर्यंत उसळणाऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा त्याची विकेट गमावली आहे.

केलेल्या ट्विटवर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या सीझनमध्ये कोहलीने निश्चितपणे 2 अर्धशतके झळकावली, परंतु जागतिक क्रिकेट कोहलीला ज्या शैलीसाठी ओळखले जाते त्या शैलीत तो फलंदाजी करू शकलेला नाही.

IPL 2022 मध्ये विराटने एका डावात 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या. कोहलीने या मोसमात 32 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत. या मोसमात कोहलीच्या फलंदाजीत आत्मविश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो आहे.

विराट कोहली आता विश्रांतीवरती आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो भारतीय संघाचा भाग नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात कोहली आता थेट मैदानावरती खेळताना दिसणार आहे. म्हणजेच आता कोहली थेट कसोटीत पुनरागमन करेल. इंग्लंडच्या भूमीवर दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक न झळकावण्याचा दुष्काळ कोहली संपवू शकेल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT