कोहलीला भेटण्यासाठी फॅन पोहोचला मैदानावर; व्हिडीओ बघून हसू आवरणार नाही

विराटशी हातमिळवणी केल्यानंतर चाहत्याने दिलेल्या प्रतिक्रियेचीही जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
RCB
RCB Dainik Gomantak

IPL 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानने RCB चा 7 गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2008 नंतर दुसऱ्यांदा राजस्थानचा संघ आयपीएलचा IPL 2022 फायनल सामना खेळणार आहे. क्वालिफायर 2 मध्ये कोहली पुन्हा एकदा बाद झाला. या मोसमात कोहलीच्या बॅटमधून फक्त 2 अर्धशतके झळकली आहेत. विराट आपल्या खराब फॉर्मशी झगडत असला तरी त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही कमतरता राहिलेली नाही. (Fan arrives on the field to meet Virat Kohli You cant help but smile while watching the video)

RCB
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत स्टॅमिना क्लबची घोडदौड कायम

राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोहली क्रिजवर फलंदाजीसाठी उपस्थित असताना एका चाहत्याने सुरक्षा मोडत, मैदानावर पोहोचून कोहलीशी जबरदस्तीने हात मिळवणी करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर विराटशी हातमिळवणी केल्यानंतर चाहत्याने दिलेल्या प्रतिक्रियेचीही जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

असे झाले की, ती व्यक्ती मैदानावर पोहोचताच कोहलीशी हात मिळवणी करत होता, त्याने आनंदाने उडी मारली आणि उत्साहाने प्रतिक्रिया देऊ लागला. यानंतर सुरक्षा रक्षक आले आणि त्या व्यक्तीला मैदानावरून बाहेर काढले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालत आहे.

याआधी लखनऊविरुद्धच्या सामन्यादरम्यानही हा व्यक्ती मैदानात आला होता, मात्र कोलकात्याच्या सुरक्षा रक्षकाने वेळीच कोहलीच्या फॅनला खांद्यावर उचलून मैदानाबाहेर काढले. पण अहमदाबादमध्ये असे होऊ शकले नाही आणि चाहत्यालाही त्याच्या हिरो कोहलीला भेटण्याची संधी मिळाली आणि मधल्या मैदानावर सेलिब्रेशन करून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

RCB
दिनेश कार्तिक बनला डिव्हिलियर्सचा विक्रम मोडणारा पहिला फलंदाज

चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली असली तरी सामन्यादरम्यानची सुरक्षा पूर्णपणे बरोबर नव्हती हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com