Sania Mirza  Dainik Gomantak
क्रीडा

Sania Mirza - Shoaib Malik: ऑस्ट्रेलियन ओपनवरून परतलेल्या सानियाला शोएबची 'जादू की झप्पी'? Video Viral

सानिया मिर्झासाठी दुबईत तिच्या कुटुंबिय आणि मित्रपरिवाराने दुबईमध्ये सरप्राईज पार्टी आयोजित केली होती.

Pranali Kodre

Sania Mirza - Shoaib Malik: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. त्यानंतर तिच्यासाठी तिच्या कुटुंबिय आणि मित्रपरिवाराने दुबईमध्ये सरप्राईज पार्टी आयोजित केली होती. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सानिया भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नासह ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीत खेळली. यामध्ये सानिया आणि रोहन यांच्या जोडीने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यांना अंतिम सामन्यात ब्राझीलच्या ल्युसा स्टेफानी आणि राफेल मातोस या जोडीने 6-7 (2-6), 2-6 अशा फरकाने पराभूत केले.

हा सानियाचा अखेरचा ग्रँडस्लॅम सामना ठरला. तिने या स्पर्धेपूर्वीच स्पष्ट केले होते की ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धा अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असणार आहे. त्यानंतर ती दुबईमध्ये तिच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा खेळणार आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना खेळल्यानंतर सानिया तिच्या मुलगा इझहानसह दुबईला आली. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी पार्टी ठेवली होती. या पार्टीदरम्यान सानियाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकही सामील होता असे म्हटले जात आहे.

याचा व्हिडिओ शेअर करताना सानियाने लिहिले की 'जेव्हा तुम्ही घरी येता आणि तुम्हाला जाणवते की तुम्हाला जगातील सर्वोत्तम कुटुंब आणि मित्र मिळाले आहेत. माझे दुबईतील कुटुंब.'

या व्हिडिओमध्ये दिसते की सानियाचे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि मित्रपरिवारांनी मिठी मारत अभिनंदन केले. यातील एक सदस्य शोएब मलिकही असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. त्याने फुलांच्या गुच्छा देत मिठी मारून तिचे स्वागत केले असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान सानियाने हा व्हिडिओ पोस्ट करताना शोएबचा उल्लेख केलेला नाही.

महत्त्वाचे म्हणजे शोएबने सानियाने अखेरचा ग्रँडस्लॅम सामना खेळल्यानंतर तिचे कौतुक करणारे ट्वीट केले होते. त्यात त्याने म्हटले होते की ती महिलांसाठी आदर्श आहे.

दरम्यान सानिया आणि शोएब यांच्या नात्यात कटूता आल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही अनेकदा समोर आल्या होत्या. मात्र अद्याप या दोघांकडूनही याबाबत कोणतेही विधान समोर आलेले नाही. सानिया आणि शोएब 2010 साली विवाहबंधनात अडकले होते. त्यांना इझहान नावाचा 4 वर्षांचा मुलगाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT