Australian Open 2023: जोकोविच 22 व्यांदा ग्रँडस्लॅम विजेता! फायनलमध्ये त्सित्सिपास पराभूत

जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखत 22 वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
Novak Djokovic
Novak DjokovicDainik Gomantak

Australian Open 2023: ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद रविवारी सार्बियाच्या नोवाक जोकोविचने पटकावले. जोकोविचचे हे 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. त्यामुळे तो पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडूही ठरला असून त्याने याबाबतीत स्पेनच्या राफेल नदालची बरोबरी केली आहे. नदालनेही 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

जोकोविचने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखत ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासला पराभूत केले. जोकोविचने हा अंतिम सामना 6-3, 7-6 (7-4), 7-6 (7-5) असा जिंकला. याबरोबरच त्याने 10 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवण्याचाही कारनामा केला.

(Novak Djokovic beat Stefanos Tsitsipas in Australian Open 2023 final and won 22nd Grand Slam Title)

Novak Djokovic
Australian Open: ग्रँडस्लॅमचं स्वप्न भंगलं! सानिया मिर्झा - रोहन बोपन्ना फायनलमध्ये पराभूत

या अंतिम सामन्यात पहिल्या सेटपासूनच जोकोविचने वर्चस्व राखले होते. त्याने पहिल्या सेटमध्येच त्सित्सिपासला फारशी संधी न देता 4-1 अशी आघाडी घेतली होती. पण नंतर त्सित्सिपासने पुढचा गेम जिंकत 4-2 अशी आघाडी कमी केली. मात्र जोकोविचने त्याची लय कायम ठेवत हा सेट सहज 6-3 असा जिंकला.

दुसऱ्या सेटपासून मात्र त्सित्सिपासने जोकोविचला तोडीस तोड आव्हान दिले होते. या सेटमध्ये दोघांनीही बिनतोड सर्विस केल्या. दोघांनाही एकमेकांची सर्व्ह तोडता न आल्याने सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी झाली. त्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला, ज्यामध्ये जोकोविचने 7-4 असा सहज विजय मिळवला.

Novak Djokovic
Australian Open 2023: सबलेन्काने जिंकले पहिले ग्रँडस्लॅम, कोचलाही आवरेना आनंदाश्रू; पाहा Video

तिसरा सेट निर्णायक ठरणार होता. या सेटमध्ये त्सित्सिपासने जोकोविचची सर्विस तोडत चांगली सुरुवात केली होती. पण लगेचच पुढच्याच गेममध्ये जोकोविचने त्सित्सिपासची सर्विस तोडली आणि बरोबरी साधली. त्यानंतरही दोघांनीही आपापल्या सर्विस राखल्या त्यामुळे पुन्हा सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी झाल्याने टायब्रेक झाला.

या टायब्रेकमध्येही जोकविचचे वर्चस्व राखले आणि त्याने 7-5 असा टायब्रेक जिंकत ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जोकोविचला कोरोना लसीवरून झालेल्या वादामुळे या स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली नव्हती. पण यावर्षी त्याने या स्पर्धेत पुनरागमन करत पुन्हा विजेतेपदावर नाव कोरले.

या विजयानंतर जोकोविच पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला आहे. तसेच त्सित्सिपासनेही त्याचे क्रमवारीतील सर्वोच्च तिसरे स्थान पुन्हा मिळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com