Sandeep Lamichhane Dainik Gomantak
क्रीडा

Sandeep Lamichhane: बलात्कार प्रकरणात अडकलेला क्रिकेटर परतणार, वर्ल्डकपसाठी घेतला मोठा निर्णय

Cricket Association Of Nepal: लामिछानेवरील निलंबन मागे घेतल्याचा अर्थ तो नेपाळच्या आगामी क्रिकेट विश्वचषक लीग 2 तिरंगी मालिकेत नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध मायदेशात खेळेल.

दैनिक गोमन्तक

Sandeep Lamichhane: क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) ने बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगलेला क्रिकेटपटू संदीप लामिछानेला मोठा दिलासा देऊन सर्वांनाच चकित केले आहे.

बलात्कारासारख्या गंभीर आरोपाचा सामना करत लामिछाने मैदानात परतणार, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती, त्यामुळे या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. लामिछानेवरील निलंबन मागे घेतल्याचा अर्थ तो नेपाळच्या आगामी क्रिकेट विश्वचषक लीग 2 तिरंगी मालिकेत नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध मायदेशात खेळेल.

लमिछाने खेळणे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून

नेपाळ क्रिकेट असोसिएशनचे महाव्यवस्थापक बृतांत खनाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लामिछानेवरील निलंबन मागे घेण्यात आले आहे. तिरंगी मालिकेत खेळण्यासाठी त्याला नेपाळ न्यायालयाने (Court) जारी केलेल्या नियमांचा आदर करावा लागेल. नेपाळचा (Nepal) परदेश दौरा असेल, तर त्या मालिकेत लामिछाने खेळणे न्यायालयाच्या परवानगीवर अवलंबून असेल.

लामिछानेला देशाबाहेर जाण्यास बंदी

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काठमांडूमध्ये अटक वॉरंट जारी झाल्यानंतर लामिछानेला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते. नंतर न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत त्याला US$15,300 च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार तो देश सोडून जाऊ शकत नाही.

लामिछाने प्रत्येक टी-20 लीगमध्ये खेळला आहे

22 वर्षीय लामिछाने नेपाळचा सर्वात हाय-प्रोफाइल क्रिकेटर आहे. तो एकमेव नेपाळी क्रिकेटपटू आहे, ज्याने जगाच्या सर्व भागात चालणाऱ्या T20 लीगमध्ये भाग घेतला आहे. तो आयपीएल, बीबीएल, पीएसएल, बीपीएल आणि सीपीएलमध्ये खेळला आहे.

लामिछाने याच्या नावावर अनेक विक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा संदीप लामिछाने हा दुसरा खेळाडू आहे. त्‍याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये तिसर्‍या जलद गतीने 50 विकेट घेतल्या. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2022 मध्ये केनियातील T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

Viral Video: रील्स बनवणाऱ्या तरुणीला माकडानं शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘सस्त्यात सुटली’

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT