Sandeep Singh: धक्कादायक! महिला प्रशिक्षकाचा विनयभंग, क्रीडा मंत्र्यांविरुद्ध FIR दाखल

माजी हॉकीपटू संदीप सिंग विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे.
Sandeep Singh | Haryana Minister Sandeep Singh | Sexual Harassment Case
Sandeep Singh | Haryana Minister Sandeep Singh | Sexual Harassment Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Sandeep Singh: भारतीय हॉकी विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्याविरुद्ध महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केला असल्याचा आरोप झाला आहे.

महिला प्रशिक्षकाने चंदीगढ पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल केली आहे. चंदीगढमधील सेक्टर २६ पोलीस स्टेशनमध्ये संदीप सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्याची पुष्टी चंदीगढ पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे.

(Sexual harassment allegations against Haryana sports minister and Indian Hockey Team's Former Player Sandeep Singh)

Sandeep Singh | Haryana Minister Sandeep Singh | Sexual Harassment Case
Indian Women Hockey टीमचे नेशन्स कप जिंकताच जंगी स्वागत अन् लाखांचे बक्षीसही जाहीर, व्हिडिओ व्हायरल

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप सिंग यांच्याविरुद्ध 31 डिसेंबर रोजी कलम 354, 354A, 354B, 342, 506 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार महिला प्रशिक्षकाने आरोप केला आहे की संदीप सिंग यांनी त्यांना शासकीय निवासस्थानी बोलावून विनयभंग केला आहे. याबद्दलची तक्रार मुख्यमंत्री आणि हरियाणाचे गृहमंत्री यांच्याकडेही करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून काही मदत मिळाली नाही. त्यामुळे सध्या संदीप सिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे.

Sandeep Singh | Haryana Minister Sandeep Singh | Sexual Harassment Case
Hockey India: वर्ल्डकप पदकाचा 47 वर्षांचा दुष्काळ संपवताच हॉकी संघाला 'एवढ्या' लाखांचे बक्षीस

याशिवाय पीडित महिला प्रशिक्षकाने असाही आरोप केला आहे की संदीप सिंग यांनी महिला खेळाडूंबरोबरही छेडछाड केली आहे. तसेच महिला प्रशिक्षकाला पोस्टिंग आणि अन्य सुविधांबद्दल प्रलोभन दाखवण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्याला नकार दिल्याने त्यांचे ट्रान्सफर करण्यात आले. त्यांचे ट्रेनिंगही बंद करण्यात आले होते.

दरम्यान, संदीप सिंग यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यात म्हटले आहे की त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. त्यांच्याविरुद्ध षटयंत्र रचले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com