Sameer Rizvi Instagram
क्रीडा

IPL 2024 Auction: CSK ने तब्बल 8.40 कोटींना खरेदी केलेल्या रिझवीचा कसा आहे परफॉर्मन्स?

Sameer Rizvi in CSK: समीर रिझवी या 20 वर्षीय खेळाडूला चेन्नई सुपर किंग्सने 8.40 कोटी रुपयांना खरेदी करत संघात घेतले आहे.

Pranali Kodre

Sameer Rizvi Who is sold for 8.40 sold to the Chennai Super Kings for 8.40 Crore in IPL 2024 Auction:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईत होत आहे. या लिलावात अनेक विक्रमी बोली लागल्या. काही अनुभवी स्टार खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली. याचदरम्यान एका खेळाडूच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले. हे नाव म्हणजे समीर रिझवी.

20 वर्षीय समीरला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस होती. मात्र, त्याला अखेर चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात घेतले. त्याच्यासाठी चेन्नईने 8.40 कोटी रुपये मोजले.

दरम्यान, त्याला इतकी मोठी रक्कम मिळालेली पाहून त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांमध्ये दिसली.

उत्तर प्रदेशकडून खेळतो समीर

6 डिसेंबर 2003 रोजी मेरठमध्ये जन्मलेल्या समीरने वयोगटातील क्रिकेट गाजवले आहे. नुकतेच त्याने यावर्षी पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या उत्तर प्रदेश टी२० लीग स्पर्धेत कानपूर सुपरस्टार्स संघाकडून दमदार फलंदाजी केली होती.

तो या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाराही खेळाडू आहे. तसेच त्याने या स्पर्धेत दोन दमदार शतकांसह 10 सामन्यांत 455 धावा ठोकल्या आहेत. त्याने या स्पर्धेत गोरखपूर लायन्सकडून खेळताना 49 चेंडूत शतक ठोकले होते.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या या कामगिरीमुळे त्याला पंजाब किंग्ससह तीन फ्रँचायझींनी ट्रायल्ससाठीही बोलावले होते. मात्र 23 वर्षांखालील लिस्ट ए स्पर्धेमुळे त्याला या ट्रायल्स देता आल्या नाहीत. परंतु, असे असले तरी त्याने त्याची प्रतिभा लिस्ट ए स्पर्धेत दाखवली.

त्याने 23 वर्षांखालील राजस्थान संघाविरुद्ध पहिल्याच सामन्यात 65 चेंडूत 91 धावा ठोकल्या. त्याने या स्पर्धेत 23 वर्षांखालील उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशने 23 वर्षांखालील लिस्ट-ए स्पर्धाही जिंकली.

या स्पर्धेतही त्याने 7 सामन्यांत 75.67 च्या सरासरीने 454 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

19 वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व

समीरने 19 वर्षांखालील भारतीय संघाकडूनही क्रिकेट खेळले आहे. तो आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत वरिष्ठ स्तरावर 2 प्रथम श्रेणी सामने खेळला असून 17 धावा केल्या आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 11 सामने खेळले असून २०५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ११ टी20 सामने खेळले असून 49.16 च्या सरासरीने 295 धावा केल्या आहेत.

दरम्यान, आता या प्रतिभावान खेळाडूला चेन्नईने आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये चेन्नईकडून खेळताना दिसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT