Sakshi Malik Dainik Gomantak
क्रीडा

Commonwealth Games 2022 मध्ये साक्षी मलिकची गोल्ड कामगिरी

Commonwealth Games: साक्षीने 0-4 अशा फरकाने सुवर्णपदक जिंकले.

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये साक्षी मलिकने महिलांच्या 62 किलो फ्रीस्टाइल प्रकारात भारताला आठवे सुवर्णपदक मिळवून दिले. साक्षीने 0-4 अशा फरकाने सुवर्णपदक जिंकले, जे भारताचे एकूण 23 वे पदक होते.

दरम्यान, साक्षीने फ्री स्टाईल 62 किलो गटात कॅनडाच्या (Canada) अ‍ॅना गोडिनेझ गोन्झालेझचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. साक्षीने अ‍ॅनाला पहिला फटका मारुन चार गुण मिळवले. त्यानंतर पिनबॉलसह ऐतिहासिक विजयाची नोंद केली. साक्षी मलिकचे हे पहिले सुवर्ण आहे. साक्षीने यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य (2014) आणि कांस्यपदक (2018) जिंकले आहे.

दुसरीकडे, भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव करुन विजेतेपद कायम राखले. टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगने इंग्लंडच्या जॉर्ज रामवर तांत्रिक श्रेष्ठतेने (10-0) विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या कांस्यपदक विजेत्या बजरंगने सामन्याच्या सुरुवातीपासूनच मॅकनीलवर दबाव आणण्यास सुरुवात केला, तर मॅकनील त्याच्यासमोर निष्प्रभ दिसत होता. या विजयासह भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) सात सुवर्णपदके जिंकली आहेत. दुसरीकडे, कुस्तीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे, तर पहिले पदक अंशू मलिकने (रौप्य) महिलांच्या 57 किलो वजनी गटात जिंकले.

तसेच, भारतीय महिला कुस्तीपटू अंशू मलिकने शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 57 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्यपदक जिंकून देशाचे कुस्ती खाते उघडले. अंशूला अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडुनायो फोलासाडे एडुकुरॉयकडून 3-7 असा पराभव पत्करावा लागला. याआधीच्या प्रत्येक सामन्यात अंशूने वर्चस्व गाजवले. तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिमोनिडिस आणि उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोटागेचा पराभव केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT