Pakistan Football Team Dainik Gomantak
क्रीडा

India vs Pakistan: भारताविरुद्ध मॅचआधीच पाकिस्तान टेंशनमध्ये! 'या' कारणामुळे केवळ 8 तासआधी खेळाडू पोहचले बंगळुरूत

बुधवारी भारताविरुद्ध फुटबॉल सामना खेळण्यासाठी बंगळुरूमध्ये पोहचण्यासाठी पाकिस्तान संघाला मोठे कष्ट घ्यावे लागले.

Pranali Kodre

SAFF Championship 2023, India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान फुटबॉल संघात बुधावारी SAFF चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेतील सामना होत आहे. या सामन्याने दोन्ही संघ या स्पर्धेतील आपली मोहिम सुरु करणार आहे.

पण या सामन्यासाठी बंगळुरूमध्ये पोहचण्यासाठी पाकिस्तान संघाला मोठे कष्ट घ्यावे लागले. पाकिस्तान संघाचे काही खेळाडू सामन्याच्या साधारण 8 तासआधी बंगळुरूमध्ये पोहोचले.

भारत आणि पाकिस्तान संघातील सामना बंगळुरूमधील श्री कांतिरावा स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकून मैदानात उतरत आहे, तर पाकिस्तान संघ मॉरिशियसमध्ये 4-नेशन कप खेळल्यानंतर मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी अशी माहिती मिळाली होती की पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसाच्या समस्येमुळे उशीर होणार आहे. पण असा असे समजत आहे की पाकिस्तान संघ सामन्याच्या केवळ काही तास आधी बंगळुरूला पोहचला आहे.

इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान संघ मॉरिशियसवरून मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजता निघाला होता आणि मुंबईत बुधवारी रात्री 1 वाजता पोहचला. पण अखेरच्या क्षणी पाकिस्तानच्या संघातील सर्व 32 सदस्यांसाठी मुंबईहून बंगळुरूला एकत्र विमानाची तिकिटे मिळाली नाहीत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या विमानांमधून पाकिस्तान संघातील सदस्य बंगळुरूला पोहोचले.

पाकिस्तान संघाचे मॅनेजर हसनैन हैगर यांनी इएसपीएनला सांगितले की 'आम्ही रात्री 1.30 वाजता मुंबईत पोहचलो. पण त्यावेळी पासपोर्ट कंट्रोल ऑफीसमध्ये कोणी अधिकारी नव्हते. ते अर्धातासाने आले आणि आम्हाला काही फॉर्म भरण्यासाठी दिले, ज्या व्हिसा फॉर्मही होता, जो आम्ही आधीच भरला होता आणि मुंबई येण्यापूर्वीच अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला होता.'

'या प्रक्रियेमध्ये काही वेळ गेला. त्यामुळे पहिला ग्रुप (सहा खेळाडू आणि सहा अधिकारी) पहाटेचे 3.55 वाजताचे विमान पकडू शकला. पण दुसऱ्या ग्रुपचे (14 खेळाडू आणि 6 अधिकारी) विमान चूकले कारण त्यांच्या फॉर्मला मंजूरी मिळण्यास उशीर झाला.'

त्यामुळे दुसरा ग्रुप मुंबईहून सकाळी 9.15 वाजताच्या विमानाने निघाला आणि बंगळुरूला 11 वाजता पोहोचला. त्यानंतर खेळाडूंना हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुपारचे 1 वाजले. या सर्व समस्यांमुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळालेली नाही.

दरम्यान, असे असले तरी सामना निर्धारित वेळेतच सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT